अपघातगून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

चिंचवड स्टेशनं बनले “अवैध वाहतुकीचा आड्डा” व धोकादायक बनला वाहतूकीचा मार्ग..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २९ सप्टेंबर २०२३ चिंचवड स्टेशन मुख्य चौक आणि परिसर अवैध प्रवासी वाहतुकीचे आड्डा बनला असून, येथून दररोज शेकडो वाहनांची ये जा होते. तसेच, रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने शहराच्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड स्टेशन हे गजबजलेले व नावाजलेले असल्याने विविध कामानिमित्त मुंबईला जावे लागते. या ठिकाणांहून जाण्यासाठी प्रवासी वाहनांची संख्या पुरेशी नसल्याने अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे.

चिंचवड स्टेशन येथून मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक चालते, याचे मुख्य कारण नागरिकांची गरज हेच आहे. या वाहनांमुळे नागरिकांची गरज भागते; मात्र या प्रवासात निर्माण होणाऱ्या धोक्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित होतो. येथून वाहतूक करणारी बरीचशी वाहने ही खासगी अर्थात ‘पांढऱ्या’ नंबर प्लेटची आहे. त्या वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना नाही. तसेच, जास्त पैसे मिळविण्यासाठी एका वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जातात.
अपघातानंतर जाग येणार का ?
चिंचवड मुख्य चौक अगदी पिंपरी पोलिस स्टेशन समोरील परिसर अवैध प्रवासी वाहतुकीचा आड्डा बनला असून, येथून दररोज शेकडो वाहनांची ये-जा होते. तसेच, रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने शहराच्या चौकात मोट्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
नागरिकांना विविध कामानिमित्त मुंबईला जावे लागते. त्यामध्ये अगदी रस्ता ओलांडल्यानंतर असलेल्या या ठिकाणांहून मुंबईला जाण्यासाठी महामंडळचे बस स्थानक असून ही अवैध प्रवासी वाहतूक नागरिकांना पर्यायी व्यवस्था कोणाच्या वरदहस्ता खाली उभी राहिली हे देखील पहावे लागेल. तसेच, चिंचवड मधून प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने एकाचवेळी मोठ्या संख्येने ह्या परिसरात थांबलेली असतात. यातील बहुतांश वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. तर, काही वाहने येथील जवळच्या वाहनतळात उभी केलेली असतात. या वाहनांची संख्या शंभरहून अधिक असण्याची शक्यता आहे.

अवैध वाहने उभी असतात अशी आमच्या निदर्शनास आलेली ठीकाणे..

१) दवा बाजार येथे असलेल्या रस्त्यावर.

२) चिंचवड स्टेशनच्या आतील पार्किंगमध्ये.

३) चिंचवड बस थांब्याच्या समोरील बाजूस.

या “अवैध’ “वाहतूक बाबत पोलिस आयुक्त काय कारवाई करणार ?

शहरातील अवैध धंद्यांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांवर पोलिस आयुक्त यांनी तशी कधी थेट कारवाई केली आहे का?
यात सामिल अधिकाऱ्यांचे निलंबनही करण्यात यावे अशी मागणी जनतेकडून होता आहे. त्यामुळे चिंचवड स्टेशन येथून मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी पोलिस आयुक्त काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी चिंचवड ट्रॅफिक विभागाच्या निरीक्षकांनी या ठीकाणावर कधी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? असा सवाल जनता विचारत आहें.

चिंचवड स्टेशन येथे चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीबाबत अपघात झाल्यानंतरच वाहतूक पोलिसांना जाग येणार का? असा ही प्रश्न उपस्थित होतो आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!