विसर्जन करताना एका पाच वर्षीय चिमुकल्याचा हौदात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड २९ सप्टेंबर २०२३ गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी राज्यभरातील घरगुती आणि मंडळाच्या गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या. काही मंडळांनी गुरुवारीच बाप्पाचं विसर्जन केलं. तर काहींनी आज सकाळी बाप्पाला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. यावेळी काही ठिकाणी या मिरवणुकांदरम्यान तसंच विसर्जन करतात दुर्घटनाही घडल्या आहेत. आता पिंपरी चिंचवडमधूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
देशभरात गणेश विसर्जन उत्सव मोठ्या उत्साहात पार पडलं. ढोल ताशांचा गजर आणि डीजेच्या तालावर तरुण थिरकताना दिसून आले. भावपूर्ण वातावरणात बाप्पांना निरोप दिला गेला. मात्र पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे गणरायाच्या विसर्जन उत्सवात दुःखद बातमी समोर आली आहे. काल गुरुवारी सायंकाळी विसर्जन करत असताना “अर्णव अशिष पाटील” या एका पाच वर्षीय चिमुकल्याचा हौदात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.



