महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

राष्ट्रवादी पक्षातर्फे शरद पवार साहेबांचे दापोडीत जंगी स्वागत..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ ऑक्टोंबर २०२३ भटके विमुक्त प्रतिष्ठा संघ तर्फे आयोजित लोकनेते खासदार मा. शरदचंद्र पवार साहेब हे आज दापोडीत आले होते.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष
तुषार गजानन कामठे म्हणाले की आमचे नेते ज्या ज्या वेळेस शहरात येतील त्या त्या वेळेस जंगी स्वागत करणे हे आमचे कर्तव्यच आहे. महिलांनी सुद्धा यावेळी जेसीबी मध्ये उभे राहून साहेबांवर फुले उधळली. यावेळी 700 ते 800 राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्तिथ होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश म्हस्के, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, कामगार नेते अरुण बोऱ्हाडे, मा. नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, शकुंतला भाट, अजय नानासाहेब शितोळे, कविचंद भाट, जेष्ठ नेते देवेंद्र तायडे, प्रदेश सरचिटणीस राजन नायर, महिला अध्यक्षा ज्योतीताई निंबाळकर, कष्टकरी नेते काशिनाथ नखाते, प्रवक्ते माधव पाटील, युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ, सामाजिक न्याय सेलचे प्रदेश सचिव के.डी.वाघमारे, ओबीसी अध्यक्ष विशाल जाधव, निलेश पुजारी आदी उपस्तिथ होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!