गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई०४ सराईत गुन्हेगारांना ०५ पिस्टल व १० रांऊडसह अटक

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ ऑक्टोंबर २०२३ मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये व्ही. व्ही. आय. पी. दौऱ्याचे अनुषंगाने व गणेशोत्सवाचे काळात आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरीता संशयीतांची तपासणी मोहिम राबविणेबाबत गुन्हे शाखांच्या सर्व अधिकारी यांना सराईत गुन्हेगारांचे हालचालीवर लक्ष ठेवणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.
त्यानुसार त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे व अंमलदार हे संशयीतांची माहिती काढत असतांना, सहा. पोलीस फौजदार रमेश गायकवाड, पोलीस हवालदार गणेश गिरीगोसावी व विजय नलगे यांना बातमी मिळाली की एक इसम जगताप डेअरी चौक, साई मंदीरासमोर ब्रिजचे खाली,
रहाटणी, पुणे येथे थांबलेले असुन त्याचे जवळ पिस्टल सारखे हत्यार आहेत अशी बातमी मिळाल्याने, खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंगलदार यांनी सापळा लावून, अस्लम अहमद शेख रा. १६ नंबर पवार गल्ली नं. ०५. थेरगाव पुणे यास ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन ०१ देशी बनावटीचे पिस्टल, जप्त करुन, आरोपी विरुध्द वाकड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ९०७ / २०२३ आर्म ॲक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान पिस्टल विक्री करणारे आरोपी १) सचिन उत्तम महाजन, रा. मु.पो. सुरवड, ता. इंदापूर, जि. पुणे २) संतोष विनायक नातु रा. ४४/३४५ महर्षीनगर झांबरे पॅलेसजवळ चिंतामणी बिल्डींग, स्वारगेट, पुणे. ३) राहुल ऊर्फ खंडु गणपत ढवळे रा. विठल मंदीरा जवळ मु.पो. पिंपळगाव ता. दौंड जि. पुणे यांना अटक करुन, पोलीस कोठडी दरम्यान आरोपीतांकडे कौशल्य पुर्ण तपास करुन त्यांचे कडून ०४ पिस्टल व १० राऊंड हस्तगत करुन जप्त करण्यात आले.
नमूद गुन्हयात आता पर्यंत २,५५,०००/- रु. किंमतचे ०५ देशी बनावटीचे पिस्टल व १० जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आलेली आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे स.पो.फौ. रमेश गायकवाड हे करीत आहेत. आरोपी सचिन महाजन, संतोष नातु व राहुल ढवळे हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द पुणे शहर, पुणे ग्रामीण व सोलापूर येथे दरोडा, खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, जबर दुखापत करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहे. आरोपी सचिन महाजन याचेवर मोका अंतर्गत पुणे ग्रामीण येथे कारवाई झालेली आहे.
तसेच आरोपी संतोष नातु याचेवर पुणे शहर येथे तडीपार कारवाई करण्यात आली होती सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मा. सतिश माने, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा. पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, अमर राऊत तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार निशांत काळे, गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश मावसकर, प्रदीप गायकवाड, शैलेश मगर, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर कुन्हाडे, सुधीर डोळस, प्रदिप गूट्टे व भरत गाडे यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!