महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

प्रतिनिधी मुंबई, दि. ४ ऑक्टोंबर २०२३ महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगीतले.
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- डॉ.विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे -पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदुरबार- अनिल पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार

उर्वरित पालकमंत्री पदाची यादी लवकरच जाहिर होईल असे ही यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!