प्रियांशी मयूर पाटील ही विद्यार्थिनी ठरली (एशियन मेडीलिस्ट)

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि.१३ ऑगस्ट २०२६ भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी शिक्षण-९वी (चालू) रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूल उरण बोरी येथे शिक्षण घेत आहे. वय वर्षे : १४
ती उत्तम जलतरूण पट्टू असून याचिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र कडून खेळणारी एक उत्तम विंडसर्फर देखील आहे.
तीने २०२५ ते २०२६ या चालू वर्ष भरात टेक्नो २९३ गट १५ आणि गट १७ गर्ल्स या विभागात १४ नॅशनल आणी ३ इंटरनॅशनल मेडेल भारतासाठी जिंकून दिले आहेत.आणी त्यातच एक सिंगापूर इंटरनॅशनल ओपन विंडसर्फिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये कांस्य पदक व नोव्हेंबर २०२५ मध्ये थायलंड येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक पटकावून देशाचा मान वाढवला आहे.तसेच एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या विंडसर्फीग वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये ती टॉप १० मध्ये आली होती. आणि आता जुलै महिन्यात पोलॅन्ड २०२६ येथे झालेल्या युरोपीयन चॅम्पियनशिप मध्ये तिने भाग घेतला होता.तसेच ४- ८ ऑगस्ट २०२६ दरम्यान मलेशिया येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप मध्ये चूरशीची शर्यत लढत कास्य पदक पटकवला आहे.
प्रियांशी मयूर पाटील हि महाराष्ट्रातील कमी वयाची पहिली मुलगी आहे जी लागोपाठ २०२५ आणि २०२६ डबल एशियन मेडिलिस्ट आहे. या मुलीचे कौतुक होत आहे समाज, देश, शाळा व आईवडील यांचे नाव गर्वाने उंचावले आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!



