महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

युवा कार्यकर्ते विशाल क्षीरसागर यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १२ ऑक्टोंबर २०२३
सांगवी भागातील ३० वर्षांपासून स्थायीक असलेले मराठवाड्यातील युवक विशाल क्षीरसागर यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिंचवड विधानसभेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते विशाल क्षीरसागर यांना नियुक्तीपत्र नटसम्राट निळु फुले नाट्यगृह नवी सांगवी या ठिकाणी प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी शरदचंद्रजी पवार साहेब व जयंतराव पाटील साहेब यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, शहर निरीक्षक प्रकाश म्हस्के, शहराध्यक्ष तुषार कामठे, महिलाध्यक्षा ज्योती निंबाळकर, राजन नायर, देवेंद्र तायडे, राहुल आहेर, ओबीसी सेलचे अध्यक्ष विशाल जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना विशाल क्षीरसागर म्हणाले की, खऱ्या अर्थाने मी समाजकार्याचा वारसा हा माझ्या वडिलांकडून लाभलेला आहे. ते पोलीस खात्यामध्ये पोलिस ऑफिसर म्हणून काम असताना मला सामाजिक कार्याचा वसा मिळाला. त्या अनुषंगाने मी आज तुमच्यापुढे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसा घेऊन यापुढे सदैव काम करत राहील असे मी ग्वाही देतो.
येत्या काळामध्ये शंभर टक्के पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपलीच सत्ता येईल , यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही. चिंचवड विधानसभेत काम करत असताना पवार साहेबांच्या विचारांच्या लोकांना एकत्रित आणून यावेळेसचा आमदार हा आपल्याच पक्षाचा होईल. असे मी ठामपणे सांगेल ह्यासाठी बूथ लेवल पर्यंत काम करण्याची तयारी माझी आहे. आज या वाटेवर काम करत असताना पोलीस वसाहतीतील मुलं माझ्यासोबत आहेत. पोलिसांच्या वेदना मी जवळून पाहिलेली आहे. येत्या काळामध्ये पोलिसांसाठी मी सदैव कार्य तत्परतेने काम करेन. अणि पक्ष कसा वाढेल यासाठी मी खूप काम करेन असे विशाल क्षीरसागर यावेळी बोलले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!