मनोरंजनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ४१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, दि. ११ ऑक्टोबर २०२३ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ४१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक, क्रिडाविषयक कार्यक्रमांचा आनंद घेतला तसेच रक्तदान शिबीरात भाग घेऊन सामाजिक कार्यात हातभारही लावला.

प्रारंभी पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये पिंपरी चिंचवड नगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार महेश लांडगे आणि आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सातारा येथील सनदी अधिकारी एस.झेनिथ,अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम,उप आयुक्त रविकिरण घोडके, मनोज लोणकर, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

 सकाळच्या सत्रात महापालिकेच्या प्रांगणामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेच्या अधिकारी कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले तसेच रक्ताचा एक थेंब जीवनदान देण्यात किती महत्वाचा आहे याचे महत्वही त्यांनी पटवून दिले.

महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी महापालिकेच्या प्रांगणात विविध खेळांचे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुषंगाने सकाळी रस्सीखेच स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अधिकारी विरुद्ध कर्मचारी असा सामना झाला. या सामन्यात कर्मचारी संघाने अधिकारी संघाला कडवी झुंज दिली. परंतु या सामन्यात अधिकारी संघाने कर्मचारी संघावर मात देत विजय मिळवला. अधिकारी संघाचे कर्णधार म्हणून अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी भूमिका बजावली. या सामन्यात आमदार महेश लांडगे आणि आयुक्त शेखर सिंह यांनी पंच म्हणून भूमिका पार पाडली. त्यानंतर संगीत खुर्ची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महिला – पुरुष अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

दरम्यान, महिलांसाठी खास न्यू होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच पाक कला व फँन्सी ड्रेस, रांगोळी स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत तळ मजल्यावर उद्यान विभागाच्या वतीने विविध झाडांच्या एकत्रीकरणाने आकर्षक बाग तयार करण्यात आली असून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!