शिवसेना उपनेते रविंद्रजी मिर्लेकर यांच्या हस्ते गणेश आहेर यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १४ ऑक्टोंबर २०२३ दोन दिवसापूर्वी भाजपच्या घर चलो आभियाना दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळी यांनी जनतेत जावुन देशाचे पुढील पंतप्रधान कोण असा प्रश्न करत जनतेची मत जाणुन घेत असतांना शगुन चौकात त्यांनी गणेश आहेर यांना देशाचे पुढील पंतप्रधान कोणाला पहायला आवडेल असा प्रश्न विचारला असता गणेश आहेर यांनी देशाचे भावी पंतप्रधान उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दिल्यांने क्षणभर बावनकुळी गोंधळलेल्या अवस्थे मध्ये दिसुन आले व त्यांनी पुन्हा प्रश्न केला की उध्दव ठाकरे का तर गणेश आहेर यांनी उत्तर देतांना म्हटले कि हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच या देशासाठी फार मोठे योगदान आहे त्यांची सुपुञ म्हणुन पंतप्रधान उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच झाले पाहिजे असे म्हणत बावनकुळी यांची बोलते बंद केल्याने शहरभर याची चर्चा रंगतांना दिसुन येत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तसेच शिवसेना उपनेते रविंद्रजी मिर्लेकर यांच्या हस्ते गणेश आहेर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख दिलीप घोडेकर. जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, शहरप्रमुख सचिन भोसले, योगेश बाबर, अनिता तुतारे, रोमी संधु, हाजी दस्तगिर मणियार, आनंत कोर्हाळे, तुषार नवले, संतोष वाळके, अमोल निकम, गुलाब गरुड, उपस्थित होते.



