आंदोलनमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

निगडी भोसरी रोड बालाजीनगर एच.पी. पेट्रोल पंप समोरील रोडचे अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करा.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १४ ऑक्टोंबर २०२३ काही दिवसांन पूर्वी म्हणजे दि. १० ऑक्टोंबर २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मा.आयुक्त यांना निवेदन सादर केले आहे. यात त्यांनी निगडी भोसरी रोड वर बालाजीनगर टोयोटा शोरूम समोर ओढ्याचे आर.सी.सी काम करण्यात आले निगडी भोसरीचा मुख्य रहदारीचा रस्त्या आहे. गेली सहा महिने देखिल झाले नाहीत तोवर या ठिकाणी रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
सदर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत करोडो रूपयांचे काम हे ठेकेदाराला दिले परंतू जनतेच्या पैशाची नुसती उधळपट्टी केलेली दिसून येते. कोणत्याच प्रकारचे डांबरीकरण करण्यात आले नाही एक साईडचा रोडलाच फक्त डांबरीकरण करण्यात आले आहे. दुसऱ्या साईडला तसेच सोडून देण्यात आले आहे.
तरी आपण संबंधित स्थापत्य विभागाचे हे काम हाताळणारे व तपासणारे अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी.
अन्यथा आम्ही पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करणार आहोत. असे पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस विशाल कसबे यांनी यावेळी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!