साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.. राजन नायर

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड ०१ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनशील वाटचालीत अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील त्यांचे कार्य ही फार मोठे होते. शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, पददलितांच्या व्यथा-वेदना त्यांच्या साहित्यातून प्रकर्षाने उमटल्या. सर्व साहित्य प्रकारांना आपल्या अभिजात लिखाणाने त्यांनी समृद्ध केले. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. समाजातल्या दुर्बल घटकांसाठी आयुष्य वेचणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे श्री. राजन नायर यांनी यांच्या प्रतिमेस (पूतळा) पूष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मयूर जाधव, के.डी. वाघमारे, अरुण थोपटे व असंख्य जनसमूदाय उपस्थित होता.




