
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १९ ऑक्टोबर २०२३ महापालिकेत बुधवारी (दि. १८) भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीने बिल्डरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. महापालिकेत राडा घालणारे नितीन बो-हाडे भाजपचे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक आहेत.
नितीन बोऱ्हाडे यांचे चुलते आणि बिल्डर नरेश पटेल यांची बोऱ्हाडेवाडीत जमीन आहे. सव्हें नंबर ६४४ मध्ये दोघांची जमीन एकमेकांना लागून आहे. त्याच जमिनीतून विकास आराखडा मार्ग जातो, त्यावरून दोघांमध्ये वाद सुरु आहेत. त्याची सुनावणी महापालिकेत होती. त्या सुनावणीनंतर नितीन बो-हाडे आणि नरेश पटेल यांच्यामध्ये वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी बो-हाडे यांना रोखले आणि प्रकरण निवळले; पण हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
असे काहीच बोललो नाही, उलट डीपीनुसार निर्णय झाल्यास मलाच फायदा होणार. त्यामुळे बोऱ्हाडे यांनी न्यायालयात जाण्याची भाषा केली. या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार करणार नाही’.– नरेश पटेल (बांधकाम व्यवसायिक)…
“तुम्ही न्यायालयात जा अथवा कुठेही जा, मला फरक पडत नाही, असे नरेश पटेल माझ्या चुलत्याला बोलले, ते अशोभनीय होते. त्याच रागात हे घडले.”
– नितीन बोऱ्हाडे…



