
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ ऑक्टोंबर २०२३ त्याग मूर्ती माता रमाई यांच्या स्मारकाचे काम लवकरात-लवकर सूरू करण्यात यावे ही मागणी गेली कित्तेक वर्षे पालिकेला प्रशासन वेळोवेळी आदोंलन, उपोषण, करून ही पालिका प्रशासन लक्ष देत नाही. म्हणून आठवण रहावी की माता रमाईचे स्मारक लवकरात लवकर जागा ताब्यात घेवून प्रशासनाने काम सूरू करावे म्हणून एक दिवसीय धरणे आंदोलन परवा दि. १९ ऑक्टोंबर २०२३ रोजी करण्यात आले असल्याचे धूराजी शिंदे यांनी यावेळी सांगीतले. पूढे ते हे ही बोलले की बाबासाहेबांचे नातू आयु. सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर हे पालिकेत प्रशासनाला जाब विचारायला गेले तेव्हां प्रशासनाने माता रमाईची मूर्ती दाखवली व सांगीतले की लवकरच स्मारकाचे काम सूरू होनार आहे पण याला ही बराच काळ लोटला. तरी हे प्रशासन जानूनबूजून टाळाटाळ करतय असेच दिसतेय मधल्याकाळात माता रमाई स्मारक समितीने विविध पक्षांच्या नेत्याना या जागेवर बोलावून स्मारकासंदर्भातील निवेदन दिली पण याचा ही काही उपयोग झाला नाही म्हणून पून्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भिम सैनिक मावळ लोकसभा लोक प्रिय खाजदार मा श्री. श्रीरंग आप्पा बारणे, धुराजी शिंदे माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड शहर तथा रिपब्लिकन सेना पुणे जिल्हा प्रभारी, राजन नायर राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेसचे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, संगिताताई भंडारी समता सैनिक दल, प्रा. बी. बी. शिंदे आय काॅगेस झोपडपट्टी सेल अध्यक्ष, संदीप रंधवे रिपब्लिकन सेना पुणे जिल्हा अध्यक्ष, सुरेश भाऊ निकाळजे माजी पिं चिं शहर अध्यक्ष आर. पी. आय., सुधाकर वारभुवन पश्चिम महाराष्ट्र आर. पी. आय., मारुती भापकर माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते, सचिन चिखले माजी नगरसेवक मनसे, सुनिल भाऊ ढसाळ पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आर. पी. आय. आंबेडकर गट, ॲड. मिलिंद कांबळे, निलध्वज माने समता समाज संघ, बापू साहेब गायकवाड माजी अध्यक्ष भा. बौ. महासभा, दिपक लोखंडे सामाजिक कार्यकर्ते, अरुण मैराळे रिपब्लिकन सेना युवा अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा, विशाल कसबे मातंग एकता आंदोलन पिं चिं शहर अध्यक्ष, सचिन दुबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दिनकर सोमवंशी सामाजिक कार्यकर्ते, सुरज गायकवाड भिम शक्ती विद्यार्थी संघटना, रजनिकांत शिरसागर वंचित बहुजन आघाडी, रामभाऊ ठोके युवा पॅंथर, अनिल मखरे सामाजिक कार्यकर्ते, रावसाहेब कोल्हे सामाजिक कार्यकर्ते, भागवत मोटे सामाजिक कार्यकर्ते, सदानंद गवई रिपब्लिकन सेना युवा अध्यक्ष पुणे जिल्हा, दत्ता भाऊ गायकवाड रिपब्लिकन सेना सरचिटणीस पिं चिं शहर, रणजित घोबाळे रिपब्लिकन सेना उपाध्यक्ष पिं चिं शहर, विष्णु सरपते वंचित बहुजन आघाडी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




