महाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

गजेद्र गुंड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य वाटप..

प्रतिनिधी पूणे दि. २२ ऑक्टोंबर २०२३ श्री. स्वामी समर्थ मठ महर्षीनगर यांच्या वतीने मठाचे संस्थापक अध्यक्ष श्री. गजेद्र गुंड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परिसरातील विद्यार्थींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी इ.१०वी व इ.१२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य वाटप करुन उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच परिसरातील गरजू कुटुंबीयांना नवरात्री उत्सव व दसऱ्या निमित्ताने अन्नधान्य वाटप उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सादर फाऊंडेशन व हिंदू जनजागृती समितीच्या श्री. स्वामी समर्थ मठ यांच्या संयुक्त विद्यमाने पूणे येथे आसपाच्या परिसरातील मुलींना प्राचिन युध्द कलेतून मुलींचे वाढत्या काळात होणारे बलात्कार मानसिक व शारीरिक अत्याचार यापासून स्वरक्षण करता यावे ही नवं संकल्पना परिसरातील मुलींन करीता प्रामुख्याने राबविण्यात येणार आहे. यामध्ये लाठीकाठी, भाला, ढाल-तलवार इत्यादी शस्त्रांचे प्रशिक्षण वर्गात विनामूल्य सेवा श्री. रविंद्र शेळके सर देणार आहे.
या उपक्रमास यावेळी बाबाशेठ मिसाळ, अभयशेठ मांढरे, धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, भरत वैरागे, संतोष नांगरे, राजेंद्र भिडे, हर्षल वेळापुरे, राजश्री शिळीमकर, श्वेता होनराव, प्रणाली गुंड (कुपवाडे), वैशाली जगताप, सीमा गुंड, निलिमा शिरोळे, विठ्ठल बराटे, प्रतिक कदम, अनिल परदेशी, गणेश शेरला, रमेश बिबवे, शांताराम पोमण, नयन मोहळ, सुमेर परदेशी, पुष्कर अबनावे, शिवम माने, राजेश लोहकरे, हनुमंत पापळ, अमोल तांबे, अब्दुल खान, मोहसीन काझी, रविंद्र हुले, अमोल पोतदार, संदिप घोरपडे, सचिन दिक्षित, सागर गायकवाड, संतोष मोरे, शिवराज फडतरे, धनंजय शहा, अविनाश अलुलकर, राकेश भालेराव, आदेश भिसे, विजय गुंड, राजेश गायकवाड, उत्तम गुंड, ऋषभ खोपडे, रुपेश भिसे, पियुष गुंड, अशरफ शेख, अक्षय सपकाळ,श्रीकांत भिसे, झुंजार मित्र मंडळ, महर्षीनगर युवक संघटना, योद्धा ग्रुप कर्वेनगर व मित्र परिवार उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजन अरुण शिरोळे व राहुल गुंड यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाकार आणि सुप्रसिद्ध निवेदक विजय वाघचौरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!