निगडी येथील महापौर मैदानावर खाजगी विकासकांना जागा भाड्याने देण्यात येवू नये- सचिन काळभोर

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३० ऑक्टोंबर २०२३ निगडी येथील महापौर मैदानावर खाजगी विकासकांना जागा भाड्याने देण्यात येवू नये म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांना तक्रार दाखल करण्यात आली असून निगडी येथील भेळ चौक डाव्या बाजूला नियोजित महापौर मैदान असून त्या संदर्भात अ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत खाजगी विकासकांना महापौर मैदानावर जागा भाड्याने देण्यात येत असून त्या मुळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी ह्यांना क्रिकेट स्पर्धा फुटबॉल व इतर खेळाचा सराव करण्यासाठी नाहक अडचणींना सामोरे जावे लागत असून “अ’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत खाजगी विकासकांना जागा भाड्याने देण्यात येत असून जागा भाडे ५० रूपये सेअर फुट दराने ‘अ’ क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी जागा भाडे दर दिवसाला खाजगी विकासकांना देण्याच्या अशा शर्ती नियमानुसार मैदान भाडे तत्वावर देण्यात येत असून सध्या त्या ठिकाणी खाजगी विकासकांनी दोन महिने झाले असून मैदानावर ताबा घेतला असून त्या खाजगी विकासकांची जागा भाडे मुदत संपली असून सुद्धा तळ ठोकून मैदानावर बेकादेशीर अतिक्रमण करून व्यवसाय करत आहे. त्या मुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने निगडी येथील महापौर मैदानावर खाजगी विकासकांना तसेच धार्मिक कार्यक्रम बंदी घालण्यात यावी जेणेकरून शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध होईल ही अपेक्षा तसेच ‘अ’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत खाजगी विकासकांना जागा भाडे दर अल्प किमत आकारण्यात आली असून त्या संदर्भात ‘अ’ क्षेत्रिय कार्यालय अधिकारी व कर्मचारी हिंगे व कदम यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन हक्कभंग प्रस्ताव आणून कायदेशीर कारवाई करण्यात यावी महानगरपालिका जागा भाडे दर अल्प अकारुन खाजगी विकासकांना मदत केली. तसेच खाजगी विकासकांना हाताशी धरून मैदानावर बेकादेशीर ताबा घेतला प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी. असे सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर श्री.सचिन काळभोर बोलले.



