देश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

फेरीवाला हाॅकर झोन राष्ट्रिय कार्याध्यक्षपदी राजन नायर यांची नियुक्ती..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १० नोहेंबर २०२३ फेरीवाला हॉकर झोनचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद कांबळे यांच्या हस्ते विविध पदांवर नियूक्ती करण्यात आली.
राजन नायर यांचे सामाजिक क्षेत्रात असलेले अप्रमाणित काम पाहता. विविध संघनांच्या विविध पदावर नियूक्ती होत आहे. याचेच औचित्य साधून त्यांची फेरीवाला हॉकर झोन संस्थेच्या राष्ट्रिय कार्याध्यक्ष पदावर नियूक्ती करण्यात येत असल्याचे व त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देत आहे असे फेरीवाला हॉकर झोनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हाद कांबळे यांनी या वेळी सांगितले.
आज खूप महत्त्वाचा दिवस आहे हा दिवस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश घेतलेला दिवस होता आणि याच दिवशी माझी फेरीवाला हॉकर झोन संस्थेच्या राष्ट्रिय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे येणाऱ्या काळामध्ये फेरीवाल्यांचे जे काही प्रश्न असतील ते मी सोडवण्याचे काम मनापासून करीन आणि निश्चितच सर्व फेरीवाल्यांना न्याय मिळवून देण्याचे काम माझ्या हातून घडेल असे राजन नायर यांनी यावेळी सांगीतले.
फेरीवाला हाॅकर झोन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हाद कांबळे यांनी बोलले की फेरीवाला हाॅकर झोन महाराष्ट्रभर संघटनेचे काम चालू आहे. त्यातच आज राजन नायर यांच्या सारखा धडाडीचा नेता राष्ट्रिय कार्याध्यक्षपदी लाभल्याने फेरीवाला हाॅकर झोन संस्थेचे कामकाज हजार पट वेगात होतील अशी ही भावना व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे सर्व पदाधीकारी सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!