राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर समतल ब्रिज वरील नाव सुरळीत करून नुतनीकरण करा- राहुल मदने

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०९ नोहेंबर २०२३ पुण्यश्लोक माता आहिल्याबाई होळकर समतोल ब्रिजवरील पुण्यश्लोक हे नाव गळून पडण्याच्या मार्गावर आहे.
व त्यातील पुण्य ही अक्षरे पडलेली आहेत. तरी आपण समतोल ब्रिजची पाहणी करून त्याच्यावरील नाव हे सुस्थितीत करण्याचे आदेश द्यावे कारण की असे नाव राहणे म्हणजे त्या राजमातेच्या नावाचा अपमान आहे व ती विटंबना आहे.
पालिका प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
व आपण आपल्या अधिकारात त्या नावाची पाहणी करून त्यावरील नांव हे सुस्थितीत व नुतनीकरण करण्याचे आदेश द्यावे या विषयाचे निवेदन आज “मल्हार आर्मी पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल मदने” यांनी पालिका प्रशासक यांना दिले.



या वेळी बोलताना श्री. मदने बोलले की जर या कामावर लवकरात लवकर लक्ष नाही दिले तर या संदर्भात आम्हाला आंदोलन छेडायला वेळ लागणार नाही कारण हे नाव आमच्या करिता पूजनिय आहे हे पालिका प्रशासनाने लक्षात ठेवावे..
यावेळी मल्हार आर्मी पुणे जिल्हा अध्यक्ष मा. राहुल मदने, गणेश खरात, संतोष पांढरे, राजेंद्र पवार, कैलास जाधव, शिवाजी आवारे, बंडू मारकड, बंटी तरंगे, बिभीषण घोडके, विनोद बरकडे, दाजी वायकुळे, दिलीप गुळदगड, प्रभाकर कोळेकर, दादासाहेब कोपनर, प्रवीण मदने, नागनाथ वायकुळे, तानाजी कोपनर, कृष्णा वायकुळे, काका मारकड, बाळासाहेब कोपनर, अक्षय वायकुळे, दयानंद नरूटे, महेंद्र कोपनर, सतीश पाटील, दीपक वायकुळे, बालाजी कोपनर, उपस्थित होते.



