गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
महानगरपालिकेच्या वृक्षांवर विद्युत रोषणाई करणे भोवले; एका नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल..

प्रतिनीधी पिंपरी चिंचवड दि. २० नोव्हेंबर २०२३ घरासमोरील महापालिकेच्या वृक्षांवर रोषणाई केल्याप्रकरणी संजय तिवारी यांच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिंपरी महापालिकेचे सहायक उद्यान अधीक्षक राजेश वसावे (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे. तिवारी यांनी निगडी प्राधिकरणातील आपल्या बंगल्यासमोरील महापालिकेच्या वृक्षांवर रोषणाई केली होती. ४ ते १७ नोव्हेंबरपर्यंत त्यांनी वृक्षांवर रोषणाई करत विद्रूपीकरण केले. त्यामुळे विद्रूपीकरण, पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल