माता रमाई आवास योजने करिता दोन दिवस सूरू असलेल्या अमरण उपोषणास रिपब्लिकन सेना पिंपवडच्या वतीने जाहिर पाठींबा – मुकुंद रणदिवे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ नोव्हेंबर २०२३ माता रमाई आवास घरकुल योजना बालाजीनगर भोसरी येथील या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत, त्यांना घरकुला साठी शासनाचे अनुदान मिळावे म्हणून, प्रा. बी. बी. शिंदे यांनी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गेली पाच वर्षां पासून सततचा पाठ पुरावा करत आहेत, वेळोवेळी आंदोलन व पत्रव्यवहार करत होते परंतू प्रशासन आज पर्यंत काहीना काही त्रुटी काढून महानगरपालिका आयुक्त यांचे कडून अनुदान देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दिनांक ३० ऑक्टोंबर २०२३ रोजी शासनाच्या समाज कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई येथून या सामाजिक संघटनेने आयुक्तांच्या नावे पात्र लाभार्थ्यास अनुदान देण्यात यावे असा आदेश, लेखी पत्र आणून आयुक्तास समक्ष भेटून दिले आहे. तरीही महापालिका आयूक्त हे सतत टाळाटाळच करत आहेत.
त्यांना न्याय मिळावा यासाठी रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्यावतीने पदाधिकारी पिंपरी चिंचवड शहर निरीक्षक मुकुंद रणदिवे झोपडपट्टी सेल अध्यक्ष राजु गायकवाड, प्रवक्ते विजय कांबळे, आण्णा धोत्रे, यांनी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जाहिर पाठिंबा दिला. आयुक्तांना माता रमाई आंबेडकर अवास योजना नको आहे. SRA चा प्रकल्प पैसे कमविण्यासाठी सोपा जातो. दलितांनविरोधी काम करणाऱ्या अयुक्ताना आव्हान केले आहे की येत्या २ ते ३ दिवसात आनुदानाची मागणी पुर्ण केली नाही तर संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये रिपब्लिकन सेना या पक्षाच्या वतिने रास्ता रोको करून अयुक्तांना घेराव देखिल घातला जाईल असा इशारा निरीक्षक मुकुंद रणदिवे यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी देवेंद्र तायडे राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गट, राजन नायर शरद पवार गट, युवराज दाखले लोकसेवक शिवशाही व्यापारी संघटना अध्यक्ष, बहुजन भिमसेना संस्थापक/ अध्यक्ष मोहनराव मस्के, बहुजन भीमसेना महिला जिल्हाध्यक्ष महादेवी गोंजे, आम आदमी पक्ष चेतन बेंद्रे, सुरेश भिसे, ब्रह्मानंद जाधव, गौतम तायडे, ॲड. रमेश सरोदे मूलनिवासी संघ, विजय ओव्हाळ अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर, कल्याण वहाळ पिंपरी विधानसभा अध्यक्ष, बापूसाहेब गायकवाड भारतीय बौद्ध महासभा, सुरज गायकवाड भीमशक्ती संघटना अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर, अविनाश भालेराव तथागत बुद्ध विहार अध्यक्ष बालाजी नगर भोसरी, अशोक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मनोज गजभार, रवी कांबळे, प्रा. किरणजी खोजकरसर आय काँग्रेस, अजित शेख आठवले गट, ईश्वर कांबळे मराठवाडा विकास समाज विकास संस्था, महाराष्ट्र मजूर पक्ष भाऊसाहेब आढागळे, सविता आव्हाड असे असंख्य पक्ष,पार्टी, संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते




