देश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक

राष्ट्रीय ईसाई महासंघचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. राजन नायर यांच्या मध्य प्रदेशातील जबलपूरला भेट: जबलपूरच्या महापौरांनी केले स्वागत..

प्रतिनीधी जबलपूर मध्य प्रदेश दि. २१ नोव्हेंबर २०२३ राष्ट्रीय ईसाई महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. राजन नायर यांच्या मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, जबलपूरचे प्रथम नागरिक आणि जबलपूरचे नगराध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे जबलपूर जिल्हाध्यक्ष श्री. जगत प्रताप सिंग (श्री अन्नू) यांनी राष्ट्रीय ईसाई महासंघाचे राष्ट्रीय संयोजक श्री. राइट रेव्ह. फादर आनंद मुट्टुंगल, सहसंयोजक आदरणीय डुडुभैय्या आणि आर.डी.लाल साहेब तसेच श्री. जगत प्रताप सिंह यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना आपल्या घरी चहा-पाणा करिता बोलावले आणि त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यांनी श्री. राजन नायर यांना राष्ट्रीय ईसाई महासंघ यामध्ये राष्ट्रीय सरचिटणीस (प्रशासन) नियूक्त करण्यात आले. त्यामुळे डॉ. आनंद मुट्टुंगल आणि श्री. आर.डी. लाल यांचे उपस्थितांनी कौतुक केले.
जबलपूरचे नगराध्यक्ष श्री. जगत प्रताप सिंह म्हणाले की, राष्ट्रीय ईसाई महासंघाचे सहसंयोजक श्री. आर. डी. लाल साहेब यांनी जबलपूर जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षासाठी खूप चांगले काम केले आहे. त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मनापासून काम केले आहे. संपूर्ण जबलपूर जिल्हा. विशेषतः धम्मो जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आणण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. जबलपूर मध्ये ख्रिश्चन समाजाचे लोक बहुसंख्य असून ख्रिश्चन समाजाच्या मतांमुळे काँग्रेस पक्षाचे अनेक उमेदवार विजयी होतील. हे काम डुडुभैय्या आणि राष्ट्रीय ईसाई महासंघाच्या सदस्यांनी केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यांनी असेही सांगितले की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात ख्रिश्चन समाजावर खूप अन्याय अत्याचार, झाला पण जबलपूर शहरात असे काहीही होणार नाही, यासाठी ते काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सैनिक म्हणून काम करत आहे. जबलपूरचे अध्यक्ष म्हणून आपण याकडे लक्ष देऊ. सर्व फादर आणि पास्टर चांगले काम करतात, काहीजण चुकीच्या गोष्टी करतात, परंतु त्यावर, लोकांची सेवा करणे आणि त्यांच्यावर प्रेम करणे हे काम प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवले आहे. राष्ट्रीय ईसाई महासंघाचे कार्य अत्यंत आदराने केले जाते आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष त्यांचे आभार मानू इच्छितो, आणि आपण सर्व मिळून एक सुंदर भारत घडवण्यासाठी काम करू, प्रयत्न करु आणि देशाच्या विकासासाठी सर्व धर्म प्रेमाने एकत्र काम करू असे या वेळी सर्वांनी सांगीतले,
राष्ट्रीय ईसाई महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस, राजन नायर हे शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करतात आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस पदावर काम करत असताना, तसेच काँग्रेस परिवारासोबत काम करताना ते ख्रिश्चन समाज आणि अल्पसंख्याक समाजासाठी सतत लढत असतात. जबलपूरमध्ये येऊन त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला आणि त्यांना समाजाचा पाठिंबा मिळाला, त्यामुळे जबलपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी होतील अशी अपेक्षा नायर यांनी व्यक्त केली.
जबलपुर जिल्हा कमिटी व्दारे आयोजीत करण्यात आलेली बैठक यशस्वी रितीने पार पडली. त्याचबरोबर अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यासाठी सन्माननीय श्री. कमल काक अध्यक्ष मध्यप्रदेश, श्री. हनी जॉन, श्री. अरविंद ॲड्रू, श्री. मार्को बाबा, ॲड. मंजू पिल्ले, श्रीमती ज्ञानेश्वरी बेंजामिन, ॲड अल्बर्ट ॲन्थोनी, श्री. गुडविन चार्ल्स यांनी खूप सहकार्य केले. यावेळी असंख्यं समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!