पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आणि डिजिटल मीडियाच्या वतीने आज “दिवाळी फराळ ” कार्यक्रम संपन्न..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ नोव्हेंबर २०२३ काल दूपारी अखिल मराठी पत्रकार संस्था महा. राज्य. पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आणि पिंपरी चिंचवड शहर डिजिटल मीडियाच्या वतीने “दिवाळी फराळ ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला.
यासाठी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी अपार कष्ट घेतले. त्या कष्टाचे कशामध्येही मोजमाप करता येणार नाही. सर्वांच्या परिश्रमाचे फळ म्हणजे काल झालेला हा दिवाळी फराळचा “सक्सेस” कार्यक्रम होय. असे मत अखिल मराठी पत्रकार संस्था महा. राज्य.चे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरेसर यांनी मांडले. यावेळी महानगर पालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी व अखिल मराठी पत्रकार संस्था महा. राज्य.चे पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आणि पिंपरी चिंचवड शहर डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार उपस्थित होते.
काल झालेला “दिवाळी फराळ” कार्यक्रम पार पाडताना वेळ, कष्ट आणि पैशाची फिकीर न करता कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या पत्रकार मित्रांचे अखिल मराठी पत्रकार संस्था महा. राज्य.चे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरेसर यांनी अभिनंदन केले.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव बोलले की आमच्या सर्वांच्या कष्टाचे सोने झाले कारण संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे सरांनी आमच्या सर्वांच्या कामाचे खूप कौतूक केले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर डिजिटल मीडियाचे अध्यक्ष भिमराव तूरूकमारे यांनी आपले मत व्यक्त करताना बोलले की अगदी कमी वेळेत सर्वांनी एकत्र येवून खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम यशस्विरित्या संपन्न केला याचे सर्व श्रेय संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे सरांनाच जाते कारण सर्वांना वेळोवेळी सूचना करत कामातील अडचणी दूर करत होते. तेव्हां या यशाचे खरे हकदार हे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरेसरच आहेत. यावेळी संस्थेचे सर्व पत्रकार व पालिका अधिकारी उपस्थित होते.