औद्योगीककलामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

जय युवा अकॅडमी व राही फाउंडेशन आयोजित छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी..

ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य विषयक आणि शिवणकामाचे घरबसल्या कामाबाबत मार्गदर्शन

लोककल्याणकारी समाजाची पायाभरणी छत्रपती शाहू महाराजांनी केली -ॲड. महेश शिंदे.

प्रतिनिधी नवनाथ सोनवणे अहिल्यानगर दि. २८ जून २०२६ लोककल्याणकारी समाजाची पायाभरणी करून समाजसुधारणेचे प्रेरणादायी कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केले. त्यांनी आंतरजातीय आणि विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे कायदे केले. शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार होणार नाही,हे जाणून त्यांनी कोल्हापुरात मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले. विविध जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरू केली. शेती, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, सामाजिक सुधारणा, आरक्षण आदींवर अतिशय प्रभावी कार्य केल्याचे प्रतिपादन ॲड.महेश शिंदे यांनी केले.
जय युवा अकॅडमी व राही फाउंडेशन यांच्या वतीने कोल्हेवाडी येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य विषयक आणि शिवणकामाचे घरबसल्या कामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ॲड.शिंदे बोलत होते.

राही फाउंडेशनच्या संचालिका रूपाली करांडे,निलेश गर्जे,जय युवा अकॅडमीचे ॲड.दिनेश शिंदे, ॲड.मनीषा भिंगारदिवे, वनिता पाडळे,कविता अभंग, राम अभंग, उडान फाउंडेशनच्या आरती शिंदे, शिवगामीनी संस्थेच्या ॲड.गायत्री गुंड, ॲड. विद्या शिंदे, मानवता सेवा संघाच्या हेमलता कांबळे, जयश्री शिंदे, आशा वर्कर अनिता पाटोळे आदी उपस्थित होते.
प्रारंभी रूपाली करांडे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

हेमलता कांबळे यांनी महिलांना आरोग्याबाबत जागृत राहून आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन वापरले पाहिजे.केमिकलमुक्त पॅड वापरणे गरजेचे असून, बाजारातील केमिकल युक्त पॅड मधून विविध आजारांना महिला व युवती बळी पडत आहे. त्यासाठी प्लास्टिक केमिकल विहिरीत आयुर्वेदिक सॅनिटरी पॅड वापरावे असे आवाहन करून उपस्थित महिलांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.
रूपाली करांडे यांनी ग्रामीण भागातील महिलांना शहरात येऊन काम करणे घरच्या व शेतीच्या व्यापामुळे शक्य होत नाही.म्हणून प्रत्येक घरी शिवणकाम करण्याबाबत माहिती देऊन शिवणकला येणाऱ्या महिलांचे अर्ज भरून घेतले.महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्यास प्रत्येक घरी हाताला काम देणारे महिला स्वयंरोजगार प्रकल्प उपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले.
कविता अभंग यांनी आभा कार्ड, एसटीचे प्रवास कार्ड, विमा, बांधकाम मजूर कार्ड, शिष्यवृत्ती योजना, रेशन कार्ड दुरुस्ती आदी ऑनलाइन योजनांबाबत उपयुक्त माहिती महिलांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश शिंदे यांनी केले. आभार अनिता पाटोळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी कुसुम वनकर, विमल ढगे, वृषाली कराळे, रेखा दुसुंगे, संगीता बनकर यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!