आंदोलनआर्थिकदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

अखेर माता रमाई आवास घरकुल योजनेला अटीतटीच्या संघर्षानंतर हिरवा कंदील-प्रा. बी. बी. शिंदे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ डिसेंबर २०२३ “माता रमाई आवास घरकुल योजना” पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रात राबवली जावी म्हणून “सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेच्या” माध्यमातून बालाजी नगर भोसरी पुणे २६ येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील काही कुटुंब धारकाचे या योजने अंतर्गत फॉर्म भरले होते त्यापैकी योजनेच्या निकषाप्रमाणे ३७ लाभार्थी पात्र ठरले असताना त्यांचे अनुदान देण्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे काही अधिकारी टाळाटाळ करीत होते. हा संघर्ष गेली सहा वर्षापासून सूरू होता. महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण विभागाकडून तसेच नगर विकास विभागाकडून आयुक्तांना असंख्य आदेशाची पत्रे देऊन सुद्धा या योजनेस जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात होती. म्हणून सर्व हरा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक २० नोव्हेंबर २०२३ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी “भिमसृष्टी” येथे बेमुदत अमरण उपोषण सूरू केले. उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषनांर्थि पैकी एक आयू. दिलीप बनसोडे यांना वाय. सी. एम. हॉस्पिटल मध्ये रात्री दाखल करावे लागले. म्हणून समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त मा. विशाल लोंढे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे (प्रशासकांचे प्रतिनिधी म्हणून ) सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन विभाग चिंचवड यांनी येऊन माननीय आयुक्त शेखर सिंह साहेब हे बाहेर गेले असल्यामुळे आयुक्त आल्यास त्वरित बैठक लावून हा विषय निकाली काढू असे लेखी आश्वासन दिल्यामुळे सूरू असणारे बेमुदत अमरण उपोषण तात्पुरते स्थगित करून साखळी उपोषण सूरू ठेवले अखेर दिनांक ०१ डिसेंबर २०२३ रोजी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांचे अध्यक्षतेखाली आयुक्त कक्षात माता रमाई आवास घरकुल निर्माण समितीच्या सर्व कोर कमिटीच्या सहकार्याने हा विषय विशेष बाब म्हणून मंजूर करून हिरवा कंदील देण्यात आला. यावेळी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व सदस्य यांनी आनंद उत्सव साजरा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून आतिषबाजी केली. यावेळी या सामाजिक संघटनेस शहरातील अनेक संस्था संघटना व पक्षाचे प्रमुख नेते यांनी पत्र देऊन पाठिंबा दिला असल्यामुळे त्यांचे या सर्व संघटनांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहे. असे बी. बी. शिंदे यांनी सांगीतले.
या वेळेचे उपोषण करते भिमरत्न प्राध्यापक बी. बी. शिंदे, लक्ष्मण सिरसट, दिलीप बनसोडे, शालिनीताई ओव्हाळ, सुनीता कांबळे,
याप्रसंगी विशेष सहकार्य करणारे लोकसेवक युवराजजी दाखले, डॉ. कैलासभाऊ कदम मूकनायकचे वरिष्ठ पत्रकार लक्ष्मणजी रोकडे, L.i.b.चे पोलिस अधिकारी पांडूरंग जाधव साहेब, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे वरिष्ठ नेते इंजि. देवेंद्रजी तायडे, राजन नायर, आपचे प्रमुख माननीय सचिन बेंद्रे, सुरेश भिसे, ब्रह्मानंद जाधव, गौतम तायडे, सागर ओरसे, ईश्वर कांबळे, बुद्धभूषण बापूसाहेब गायकवाड, सुरज गायकवाड, अविनाश भालेराव, मनोज गजभार, ॲड. प्र . किरण खोजेकर, अजित शेख, नारायण मस्के, हरिश्चंद्र आप्पा शिंदे, तुकाराम गव्हाणे, रामभाऊ ओव्हाळ, चंद्रकांत लोंढे, जयंत जाधव, मयूर जाधव, भाऊसाहेब आढागळे, मुकुंद रणदिवे, राजू गायकवाड, सुरेश गायकवाड, रजनीकांत क्षीरसागर, शबनम सय्यद, मारुतीजी भापकर, मानवजी कांबळे, सुधाकर फुले, सावित्री शिंदे, मालन सिरसट, कलाबाई गुंजाळ, ज्ञानेश्वर बोराटे, सीमा गजभिये, सिमाली गायकवाड, अक्षय दुनघव, सविता आव्हाड, ॲड. सचिन पवार, महायान मसुरे, गोविंद गाडे, प्रल्हाद कांबळे, विकी तामचीकर, शिवराज वाघमारे, शंकरराव तायडे, ॲड. बि. के. कांबळे, वकील वर्ग यांचे अंतकरना पासून विशेष आभार.. कारण त्यांच्या सहकार्यामूळे व प्रयत्नांमुळेच आज “रमाई आवास योजनेच्या” संघर्षाला यश आले आहे. असे प्रा. बी. बी. शिंदे यांनी बोलतानां सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!