गुंडा विरोधी पथकाची उत्कृष्ठ कामगिरी खुनाचे तीन आरोपी ४८ तासांचे आत घेतले ताब्यात.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ डिसेंबर २०२३ दि.२९/१२/२०२३ रोजी महींद्रा ॲंन्ड महींद्रा कंपनीच्या गेट नं. ८ जवळ मोकळ्या जागेत एक वय ३० ते ३२ वर्षे वयाचा अनोळखी नग्ण इसम जखमी व मृत अवस्थेत मिळुन आल्याने महाळुंगे (इंगळे) पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ८०० / २०२३, भा.द.वि. कलम ३०२, २०१ प्रमाणे अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदरचा गुन्हयातील अज्ञात आरोपींचा तपास करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश मा. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी दिले होते.
गुंडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे आरोपींचा शोध घेत असताना दाखल गुन्हयातील मयत इसमाचे हातावरील बंजारा अशा गोंदणवरुन सदरचा इसम हा लमाण समाजाचा असल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आले,
मयत इसमाचा साथीदार ड्रायव्हर नामे रोहीदास राजेंद्र चव्हाण वय ३० वर्षे, धंदा ड्रायव्हर रा. मु. होळी, पो. पेठ सांगवी ता. लोहारा, जि. धाराशीव याचेकडे केलेल्या तपासावरुन सदर मयताचे नाव अमोल विकास पवार, रा. नादुरागा तांडा, ता. औसा जि. लातुर असे असल्याचे समजले. त्यानंतर प्रथम ट्रान्सपोर्ट नगर निगडी, पुणे येथुन ते गुन्हयाचे घटनास्थळापर्यतचे सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करुन सदरचा मयत इसम हा के.एस. बी. चौक, चिंचवड येथे एका ट्रेलरमध्ये चढताना दिसुन आला. त्या ट्रेलरचे नंबरवरुन सदरचा ट्रेलर हा भारव्दाज ट्रेलर सर्व्हसेस यांचा असल्याची
माहीती प्राप्त झाली. त्यांचेकडे तपास करता सदर ट्रेलरवरील ड्रायव्हर १) विष्णु अंगद राऊत, २) दुसरे ट्रेलरवरील ड्रायव्हर विष्णु राऊत याचेबरोबर इतर साथीदार ड्रायव्हर नामे दशरथ ऊर्फ सोनू जयराम आडसुळ व त्यांचा मित्र ३)
बलराम जमदाडे हे ट्रेलर पार्क करुन जेवण करण्याकरीता गेले असताना इसम अमोल पवार याने त्यांचा ट्रेलर चोरी करुन घेवुन जात असताना त्यांनी त्यास पकडले व त्याच ट्रेलरमध्ये घालुन जबर मारहाण करुन त्यास महींद्रा ॲंन्ड
महींद्रा कंपनीच्या गेट नं. ८ जवळ मोकळ्या जागेत नेवुन टाकुन दिले. ड्रायव्हर विष्णु अंगद राऊत व सोनू जयराम आडसुळ हे आपआपले ट्रेलर घेवुन मुंबईच्या दिशेने गेल्याचे समजले. दोन्ही ट्रेलरचे जी.पी.एस. सीस्टीम व्दारे माहीती घेतली असता एक ट्रेलर हा कळंबोली जि. रायगड येथे व दुसरा ट्रेलर हा बोईसर जि. घर येथे असल्याचे समजलेने गुंडा विरोधी पथकाच्या दोन स्वतंत्र टिम तयार करुन लागलीच वरीष्ठांचे आदेशाने दोन्ही ट्रेलरच्या दिशेने रवाना करुन निष्पन्न आरोपी नामे दशरथ ऊर्फ सोनू जयराम आडसुळ, वय २१ वर्षे, रा. मु.कामठा, पोस्ट आपसिंगा, ता. तुळजापुर, जि. धाराशिव यास कळंबोली जि. रायगड येथुन व निष्पन्न आरोपी विष्णु अंगद राऊत, वय २९ वर्षे, रा. मु. पो. नालवंडी, ता. व जि. बीड यास बोईसर जि. पालघर येथुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे तपास करुन त्यांचा साथीदार बळीराम वसंत जमदाडे, वय ३५ वर्षे, रा. मु. कामठा, पोस्ट हापसिंगा, ता. तुळजापुर, जि. धाराशिव याचा मोबाईल नंबर प्राप्त करुन त्या नंबरचे केलेल्या तांत्रीक विश्लेषणावरुन त्यास शशीकांत जाधव यांचे घरात भाडयाने, विठठलवाडी, देहुगाव, पुणे येथुन ताब्यात घेवुन महाळुंगे (इंगळे) पोलीस ठाणेच्या ताब्यात पुढील कारवाईकरीता देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, मा. डॉ. श्री. संजय शिंदे सह.
पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सतिश माने सहाय्यक नीस आयुक्त (गुन्हे), बाळासाहेब कोपणर सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे – १) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे
शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रविण तापकिर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, विजय गंभिरे, सुनिल चौधरी, नितीन गेंगजे, शाम बाबा रामदास मोहीते, शुभम कदम, तौसीफ शेख व टी.ए.डब्ल्यु. चे नागेश माळी यांनी केली आहे.



