आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी पिंपरी चिंचवड शहरातून हजारो समाज बांधव उपस्थित राहणार युवराज दाखले.
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड मनिषा पवार दि. ०४ डिसेंबर २०२३ काल मातंग समाजाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीचा संदर्भ भूमिपूजन आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते व्हावे याकरिता मातंग समाजामध्ये वेगवेगळ्या पक्षात व वेगवेगळ्या संघटनेत काम करणारे नेतेमंडळी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती अध्यक्ष अशोकराव लोखंडे सदस्य भास्करराव नेटके व इतर सदस्य यांनी निमंत्रित केल्याने एकत्र आले.
बैठक संपल्यानंतर क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक या ठिकाणी मातंग समाजाचे नेते. भाऊसाहेब अडागळे, व भगवानराव वैराट साहेब यांच्या शुभहस्ते समाधीस्थळी तेल वात करण्यात आली.
या प्रसंगी आमदार सुनील कांबळे, तेल वात समिती प्रमुख सुखदेव अडागळे. मातंग समाजाचे नेते आदरणीय पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व सभागृह नेते सुभाषजी जगताप साहेब, माजी नगरसेवक भरतजी वैरागे, सकल मातंग समाज समन्वयक तथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, हनुमंत नाना कसबे, लहुजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष सतिश भवाळ, नाना कांबळे, मनोज तोरडमल, संजय धुतडमल, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व अध्यक्षा भारतीताई चांदणे, सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहर महिला समन्वयक सविताताई आव्हाड, चंद्रकांत लोंढे, पत्रकार गणेश मोरे, राहुल दादा खुडे, मातंग समाजाचे सचिव दयानंद अडागळे. अनिल अडागळे. रवी भाऊ आरडे, लहुजी वस्ताद साळवे तेल वात समिती सदस्य हरिभाऊ उकरंडे व इतर समाजातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.