पिंपरी चिंचवडवर पून्हा दू:खाचा डोंगर एका दुर्दैवी घटनेत ५ विद्यार्थी देवगड येथील समुद्रात बुडाले…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १० डिसेंबर २०२३ देवगड येथील समुद्र किनार्यावर पिंपरी चिंचवडची पाच मुले बुडाल्याची माहिती शनिवारी सायंकाळी समोर आली आहे. दरम्यान, बुडालेले ५ जण हे खासगी सैनिकी अकादमीमधील मुले असल्याची प्राथमिक माहिती आहे. बुडालेल्यांमध्ये ४ मुली तर एका मुलाचा समावेश आहे.
शनिवारी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खासगी सैनिकी अकादमीतील सुमारे ३५ जणांची सहल देवगडला गेली होती. आंघोळीसाठी ते ५ जण समुद्रात गेले असताना ते बुडाल्याची माहिती समोर येत आहे.
मृतांमध्ये प्रेरणा रमेेश डोंगरे (वय २१, रा. घरकुल, चिखली पिंपरी), अनिषा नितीन पडवळ (१९, रा. चिखली ताम्हाण वस्ती), अंकिता राहुल गलाटे (२१, कृष्णनगर, चिखली) आणि पायल राजू बनसोडे (२१ रा. चिखली, पुणे) यांचा समावेश आहे तर राम डिचोलकर हा बेपत्ता आहे. दरम्यान, शोधकार्य युध्दपातळीवर सुरू असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. सर्व मृतदेह देवगड ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.



