आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात आण्णाभाऊ साठे सृष्टी निर्माण करा-युवराज दाखले

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि.१३ डिसेंबर २०२३ शिवशाही भिमशाही सामाजिक सलोखा ऐक्याच्या वतीने , साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर जन्मापासून ते त्यांच्या महानिर्वाणा पर्यंत त्यांनी केलेल्या दलित बहुजन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान तसेच परदेशातील रशिया प्रवास व तेथील अनमोल कार्य या सर्वांचा एकत्रित उल्लेखाचे शिल्प साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरामध्ये लावावीत जेणेकरून येणाऱ्या युवा पिढीला त्यांचा आदर्श कायम स्मरणात राहावा म्हणून त्या ठिकाणी तात्काळ बसविण्यात यावेत.
अशी विनंती शिवशाही भिमशाही सामाजिक सलोखा ऐक्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. बी. शिंदे, नारायण उर्फ नाना मस्के, दिलीप बनसोडे व कार्याध्यक्ष तथा लोकसेवक युवराज दाखले यांच्या स्वाक्षरीचे निवेदन उपजिल्हाधिकारी तथा उपआयुक्त विठ्ठल जोशी साहेब यांना दिले.
दरम्यान आपण दखल न घेतल्यास आम्हाला नाईलाजास्थव या विषयावर धरणे, आंदोलने, उपोषणे करावी लागतील. या कामी उद्भवणार्या सर्व गोष्टींची जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील असा इशारा लोकसेवक युवराज दाखले यांनी दिला. यावेळी शिवशाही भिमशाही सामाजिक सलोखा ऐक्यचे सर्व पदाधीकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!