कलामहाराष्ट्रशहरसामाजिक

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दू:ख निधन..

प्रतिनिधी मुंबई दि. १३ डिसेंबर २०२३ मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या चरित्र कलाकारांमध्ये अग्रणी असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेली काही वर्षे त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.
ते विनोदी कलाकार लक्ष्मीकांत बेड्रे (लक्ष्या) यांचे सख्खे बंधू होते. त्यांच्या अकस्मित अशा जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!