आरोग्यविशेषशहरसामाजिक

तळवडे आग दुर्घटनेतील आणखी एका रुग्ण महिलेचे ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १६ डिसेंबर २०२३ पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेतील जखमी रुग्ण सुमन गोधडे (वय ४० वर्षे) यांचे रात्री दोन वाजता ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आज निधन झाले. ही अत्यंत दु:खद घटना असुन कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दांत आयुक्त शेखर सिंह यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
तळवडे येथील एका कारखान्यामध्ये दि. ८ डिसेंबर रोजी घडलेल्या आग दुर्घटनेत ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता तर १० जण जखमी झाले होते. जखमींना पुढील उपचारांसाठी तातडीने पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यातील प्रतिक्षा तोरणे (वय १६ वर्षे) आणि कविता राठोड (वय ४५ वर्षे) यांचे दि.९ डिसेंबर रोजी तर शिल्पा राठोड (वय ३१ वर्षे) यांचे दि. १० डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर प्रियंका यादव (वय ३२ वर्षे) आणि अपेक्षा तोरणे (वय १८ वर्षे) यांचे दि.१४ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान निधन झाले. आज आणखी एक जखमी महिलेचे निधन झाल्याने तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या १२ इतकी झाली आहे.
या घटनेतील जखमी रुग्ण उषा पाडवी, कोमल चौरे, रेणुका ताथोड आणि शरद सुतार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!