फिरस्त्या निराधारांना दिली दिघी-बोपखेलच्या युवकांनी मायेची उब !

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड (पूणे) दि. १५ डिसेंबर २०२३ चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची मदत घ्यावी लागते, परंतु काही लोकांना तेही मिळत नसल्याने त्यांच्या नशिबी कडाक्याच्या थंडीत कुडकूडणेच येते. समाजातील अशाच काही वंचीत मनोरुग्ण, बेघर गरीब कामगार, दिव्यांग बांधवांना जात, धर्म, भाषा यांच्या पलीकडे जावून माणुसकी धर्म जोपासण्याच्या हेतूने दिघी-बोपखेल येथील युवकांच्या वतिने थंडीपासून बचाव व्हावा म्हणून ब्लॅंकेट वाटप करून मायेची उब दिली आहे.
त्या वेळी सामजिक कार्यकर्ते भाग्यदेव घुले, सायकल पटु दत्ता घुले, वैभव ज्वेलर्सचे मालक वैभव औताडे, रमेश विरणक, अमित टिळेकर, ओंकार बजबळे, दत्तात्रय (बाळु) घुले, रोहिदास जोशी, मारुती मोरे, दत्ता घुले, दिनेश लोंढे, नंदु घुले, अशोक वहिले, विजय सोनवणे आदि उपस्थित होते.
रात्रीच्या सुमारास थंडीत कुडकूडणाऱ्या निराधाराना अचानक अडचणीच्या वेळी मिळालेल्या या मदतीच्या हातामुळे अनेक गरजवंतांनी उपस्थितांचे आभार मानून आनंद व्यक्त केला..
