देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

ख्रिसमस सणाच्या निमित्ताने ओप्लाजंल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. राजन नायर यांनी झुंज दिव्यांग संस्थेला भेट दिली.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० डिसेंबर २०२३ ख्रिसमस सणाच्या निमित्ताने ओप्लाजंल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काॅग्रेस (शरद पवार गट) महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा. राजन नायर यांनी झुंज दिव्यांग संस्था या ठिकाणी जाऊन भेट दिली व या संस्थेत असलेल्या दिव्यांग मुलांसोबत व त्यांच्या माता-पित्या सोबत संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला व मुलांसोबत ख्रिसमस सन साजरा केला.
ही एक समाजाला प्रबोधनदायक गोष्ट आहे की, या संस्थेचे अध्यक्ष अशा मुलांना एकत्र करून समाजातील दानशूर व्यक्तींसोबत संपर्क साधून, त्यांचा पाठिंबा घेऊन मुलांचे पालन पोषण करत आहेत.
झुंज दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजू हिरवे आणि सचिव श्रीमती रूपाली वाळके आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून अशा मुलांना एकत्र आणून ५०% ते ९०% दिव्यांग असलेल्या मुलांना आश्रय देऊन त्यांचे संगोपन करण्याचे काम अतिशय उत्तम रितीने हि संस्था करत आहे. आजही अशा संस्था कार्यरत आहे हे मला पाहण्यास मिळाले व त्याचा आनंद ही झाला.
सरकार ने देखील अशा संस्थांना मदत करावी व समाजात असलेले समाजसेवक, कार्यकर्ता, पत्रकार, सरकारी अधिकारी, पुढारी यांनी पुढे येऊन अशा संस्थांना मदतीचा हात पुढे करून साथ द्यावी हि अपेक्षा व्यक्त करतो.
राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू श्री. शिवाजी पवार दिव्यांग असून या संस्थेमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत असताना मला खात्री आहे की, एक दिवस झुंज दिव्यांग संस्थेमधून व्हिल चेअर क्रिकेट म्हणून ऑलंपिक मधे या खेळाडूंचा उदय होईल.
आज ख्रिसमसच्या सणानिमित्त मला ह्या संस्थेला जाऊन भेट देण्याची संधी मिळाली त्याचबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले प्रेम वाटण्याची संधी मिळाली. या संस्थेचे अध्यक्ष स्वतः दिव्यांग असताना अशा मुलांना ते वेगवेगळे व्यवसायातून स्वावलंबी बनविण्याचे कार्य करताना अगदी उर भरून येतो. मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की साप्ताहिक सूट्टीला इतरत्र फिरायला जाण्या ऐवजी या व अशा संस्थांना भेट द्या जी खरच काळाची गरज आहे. दिव्यांग मूलांना भेटून तूम्हाला ही कळेल की हे मनाने कधीच दिव्यांग नव्हते व नाहीत शरिराने असून सूद्धा यांची मने गगन भरारी साठी तत्पर असतात. पण आमचे मन व विचार हे दिव्यांग झालेले आहेत, यातून बाहेर निघण्या करीता या व अशा संस्थांना भेट द्या नक्कीच यांना भेटून आपण ही पून्हा तरूण व्हाल येणार्‍या प्रत्येक क्षणावर मात करण्या करीता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!