
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड, दि. २० डिसेंबर २०२३ कथित १५०० कोटी रुपयांच्या टी. डी. आर. घोटाळ्या संदर्भात सन्मानीय आयुक्त शेखर सिंह यांनी भूमिका स्पष्ट करून तात्काळ संबंधित नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
गेल्या आठ दिवसांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अर्थिक देवान घेवाण व टी. डी. आर. घोटाळ्याने लक्तरे वेशीवर टांगलेली आहे. लाच लुचपत विभागाने अनेकांना रंगेहाथ पकडुन कायदेशीर कारवाई केलेल्या आहेत.
नव्याने नविन वर्षाच्या पूर्व संध्याच्या डिसेंबर अखेर नगररचना विभागाने उपसंचालक प्रसाद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली १५०० करोड रूपयांचा टी. डी. आर. घोटाळा झाला असल्याचे प्रसिद्धी माध्यमातुन समोर आले आहे. ही अत्यंत निंदनीय व शरमेची बाब आहे. शिवशाही व्यापारी संघ, शिवशाही भिमशाही सामाजिक सलोखा ऐक्य तसेच सकल मातंग समाजाच्या वतीने लोकसेवक युवराज दाखले यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.
सन्माननीय आयुक्त शेखर सिंह साहेब यांनी तात्काळ चौकशी समिती तयार करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर व निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचे दाखले यांनी म्हटले आहे.



