चाकण पोलीसांकडुन धडाकेबाज कारवाई” मोटार सायकल चोरीचे दोनआरोपी जेरबंद, चोरटयांकडुन एकुण ८,००,०००/- रूपये किंमतीच्या १५ मोटरसायकल जप्त..

प्रतिनिधी पिपंरी चिचंवड दि. २५ डिसेंबर २०२३ पिपंरी चिचंवड पोलीस आयुक्तालया अतंर्गत चाकण पोलीस ठाणे हददीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्याने अज्ञात व्यक्तिंकडुन मोटारसायकल चोरी होत असल्याने मा. श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिपंरी
चिचंवड, सह. पोलीस आयुक्त श्री. सजंय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३ श्री. संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांनी मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत श्री. अशोक कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांना सुचना दिल्या होत्या.
श्री. अशोक कदम, वरीष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांनी वाहन चोरांकडुन चाकण पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे उघडकरण्यासाठी वाहन चोरीचे गुन्हयासाठी विशेष पथकाची नेमणुक केली. सपोनि प्रसंन्न जराड व विक्रम गायकवाड तसेच अमंलदार हे वाहन चोरीच्या घटनास्थळावर भेट देवुन सदर परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले
तसेच सदर परीसरामध्ये मोबाईलचे तांत्रिक विश्लेषन करून घटनास्थळी दिसलेल्या इसमांबाबत माहिती प्राप्त केली. दिनांक २२/१२/२०२३ रोजी श्री. अशोक कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांचे प्रत्यक्ष मार्गदशनाखाली सपोनि श्री. प्रसंन्न जराड, पोहवा संदिप सोनवणे, पोकाॅ संदिप गंगावणे, पोना निखील शेटे, पोकॉ सुनिल भागवत हे मोटारसायकल चोरीचे गुन्हयांचे तांत्रीक विश्लेशन व १०० च्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासले व चाकण पोलीस स्टेशन हद्दीत मोटार सायकल चोरी करणारे योगेश तुकाराम देवकर व दत्तात्रय गंगाराम गाडेबैल दोन्ही रा. कवठे यमाई ता. शिरूर जि. पुणे यांना निष्पंन्न केले. त्या अनुषंगाने वरील तपास पथकाने कवठे यमाई येथे सापळा रचुन नमुद इसमांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्या नतंर त्यांचेकडे अतिशय कौशल्यपुर्ण तपास केला असता, आरोपी नामे दत्तात्रय गंगाराम गाडेबैल व योगेश तुकाराम देवकर यांनी यापूर्वी वेळोवेळी चाकण पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे हद्दीतुन चोरी केलेल्या एकुण १५ मोटार सायकली काढुन दिलेल्या असुन त्या गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
जप्त केलेल्या एकुण १५ मोटारसायकलींचे वर्णन खालीलप्रमाणे..
जप्त वाहनाचे वर्णन

सदर मोटार सायकलची माहिती प्राप्त करण्याचे काम सूरू आहे. चाकण पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी अतिशय शिताफिने व कौशल्यपुर्ण तपास करून
अटक आरोपी नामे १) योगेश तुकाराम देवकर वय ३० वर्षे, २) दत्तात्रय गंगाराम गाडेबैल वय २६ वर्षे, दोन्ही रा. कवठे यमाई ता. शिरूर जि. पुणे यांना चाकण पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आलेली असुन त्यांचेकडुन ८,००,०००/- रूपये किमंतीच्या एकुण १५ मोटारसायकल जप्त करून मोटार सायकल चोरीच्या एकुण ०९ गुन्हयांची उकल केलेली आहे. तसेच इतर ०६ वाहनांच्या इंजिन नंबर व चेसी नंबर वरून वाहन मालकांची माहिती घेवुन उकल करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त श्री. सजंय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ३ श्री. संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. युनुस मुलाणी तसेच सपोनि प्रसंन्न जराड, सपोनि विक्रम गायकवाड, पोहवा संदिप सोनवणे, पोहवा राजु जाधव, पोहवा हनुमंत कांबळे, पोना निखील शेटे, पोकॉ नितीन गुंजाळ, पोकॉ सुनिल भागवत, पोकॉ संदिप गंगावणे, पोकॉ अशोक दिवटे, पोकॉ महेश कोळी, पोकॉ विवेक सानप, पोकॉ प्रतिक चव्हाण, पोकॉ अरुण शिंदे, पोकॉ महादेव बिक्कड, मपोकॉ माधुरी कचाटे यांनी
केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रसंन्न जराड हे करीत आहेत.





yandanxvurulmus.AjzNLUnjLfSH