घोटाळेमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

बहुचर्चित टीडीआर घोटाळा प्रकरणी मनपा आयुक्त यांचा राजीनामा घेण्यात यावा-सालारभाई शेख

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ३० डिसेंबर २०२३ नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा पंधराशे कोटींचा टी. डी. आर. घोटाळाचा परदा फाश झाला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत वाकड येथील सर्वे क्रमांक 122 मध्ये क्रमांक 4/ 38 या जागेत पीएमपीएल डेपो, ट्रक टर्मिनल पार्किंग साठी आरक्षण आहे. ही जागा टी. डी. आर. मोबदला देऊन विलास जावळेकर डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा निर्णय महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला. ही आरक्षणाची जागा भूखंड एकत्रिकृत विकास नियमन नियमानुसार विकसीत करण्यास देण्याचा प्रशासकीय प्रवास सुरू झाला. महापालिका आयुक्तांनी संबंधित बिल्डरला बांधकाम परवानगी टी. डी. आर. ची मंजुरी सुधारित बांधकाम परवानगीचे सोपस्कार फटाफट पूर्ण करून सर्व मंजुरी देऊन टाकली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तब्बल 65 हजार 59 रुपये प्रति चौरस मीटर दराने संबंधित बिल्डरला दिलेल्या टी. डी. आर. मुळे बिल्डरचा तब्बल 1500 कोटी पेक्षा अधिकचा फायदा झाला. कारण रेडी रेकनर नुसार हा दर प्रती चौरस मीटर 26 हजार 620 एवढा आहे ज्यादा टी. डी. आर. देण्याचे संपूर्ण प्रकरण महापालिका आयुक्त शेखर सिंह नगर रचना विभागाचे उपसंचालक तसेच शहर अभियंता यांनी स्वतः हाताळली यामुळे बिल्डरला पंधराशे कोटींचा फायदा पोहोचवण्यात तिघांचाही या संगणमतात हात आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील हा मोठा भ्रष्टाचार आहे, असे दिसून येत आहे. तरी आपण या भ्रष्टाचारावर योग्य अशी कारवाई करण्यासाठी संशयित बिल्डर तसेच महापालिकेकडून टी. डी. आर. व घेतलेल्या एफ. एस. आय. घेतलेल्या अन्य बिल्डरांचे व्यवहार व त्यांना मिळालेला टी. डी. आर. तपासणी पकरण्यात यावी तसेच या प्रकरणात समाविष्ट असलेले महापालिका आयुक्त तसेच महापालिका कर्मचारी व अधिकारी यांच्यावर योग्य अशी चौकशी समिती नेमण्यात यावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा
तसेच या प्रकरणात झालेल्या आर्थिक देवाण घेवाणची ई. डी. मार्फत चौकशी करण्यात यावी. या आशयाचे निवेदन वेल्फर पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले या वेळी वेल्फेयर पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा सचिव सालारभाई शेख, उपाध्यक्ष खाजा नदाफ, अमिल सैफी, बाबा नदाफ, जावेद शाह, फ़िरोज तांबोळी, दाऊद नदाफ आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!