महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येस दीपोत्सवाचे आयोजन-मनोज गजभार

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड अनिरूद्ध चव्हाण दि. ३० डिसेंबर २०२३ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टी येथे शिव, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्व पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंधेस ०२ जानेवारी २०२४ मंगळवारी सायंकाळी ठीक ७:०० वाजता दीपोत्सव करण्यात येणार आहे. तरी सर्व पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व शहरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. व लहान बालकांनी महापुरुषांच्या वेशभूषेत या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती. लेणी संवर्धन टीमचे मनोज गजभार यांनी सांगीतले. यावेळी मनोज गजभार, रवी कांबळे, महायान मसुरे, सुधाकर फुले, राजू भालेराव, राम शिंदे, मुकुंद रणदिवे, दत्ता गायकवाड, सुजाताई नवघरे, प्रियाताई शेख, बेबीताई बोचकुरे, वंदनाताई गायकवाड वंदनाताई यंकुळे, कोमल तुरुकमारे, पायल गायकवाड, राहुल कांबळे, राजू सरतापे, सिद्धू नडगिरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!