अंगणवाडी शिक्षक व सेविकांचा गेला २७ दिवसापासून संप सूरू असताना त्यांच्या मागणीकडे शासन करतेय दुर्लक्ष..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३० डिसेंबर २०२३ अंगणवाडी शिक्षक व सेविकांचा गेला २७ दिवसापासून संप सूरू असताना त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असलेल्या शासनाच्या निषेधार्थ आज दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजता विठ्ठल नगर पुनर्वसन प्रकल्प या ठिकाणी अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप करण्यासाठी संस्थेचे कर्मचारी आले असता त्यांना भिमशाही युवा संघटनेच्या वतीने व विठ्ठल नगर नेहरूनगर मधील नागरीकांच्या वतीने विरोध करण्यात आला जो पर्यंत अंगणवाडीतील शिक्षकांच्या मागण्या शासन मान्य करीत नाही तोपर्यंत कोणत्याही अंगणवाडी मध्ये संस्थेच्या कर्मचाऱ्यांना खाऊ वाटप करून दिला जाणार नाही आसा ईशारा देऊन संस्थेच्या कर्मचाऱ्यांना परत पाठविण्यात आले यावेळी भिमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे तसेच विठ्ठल नगर येथील जेष्ठ नागरिक लक्ष्मण जोगदंड, युवा सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे, गोविंद बचुटे, तसेच अंगणवाडी सेविका संगीता अंजन काकडे, अरूणा यशवंत चव्हाण, सरिता अरुण मोघे, ज्योती दिगंबर बहुलीकर, उषा दत्तु भाबड, आदी उपस्थित होते.



