महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

माता रमाई आवास घरकुल योजनेच्या पात्र लाभात्याचे अनुदान याच वर्षात वितरित करणार-आयुक्त शेखर सिंह

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ३० डिसेंबर २०२३ काल दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी भीमरत्न प्रा. बी. बी. शिंदे यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिका प्रशासक मा. शेखर सिंह यांची भेट घेऊन विचारणा केली की, माता रमाई आवास घरकुल योजना समितीची बैठक या महिन्याच्या दि. ०१ डिसेंबर २०२३ रोजी आपल्या अध्यक्षतेखाली झाली, त्यामध्ये आपण बालाजीनगर, भोसरी पुणे २६ येथील एकूण ३७ पात्र लाभार्थ्यांना विशेष बाब म्हणून मंजुरी दिली. परंतु आज पर्यंत आम्हाला त्या झालेल्या बैठकीचा अहवाल मिळाला नाही. या करिता आम्ही समाज कल्याण विभाग पुणेचे सहाय्यक आयुक्त मा. विशाल लोंढे साहेब, यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, समाज कल्याणने तो अहवाल तयार करून, मा. आयुक्त पिंपरी-चिंचवड मनपा यांच्या सही करिता पाठवला आहे, कारण ते माता रमाई आवास घरकुल योजना समितीचे अध्यक्ष आहेत, म्हणून सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेचे पदाधीकारी आयुक्त शेखर सिंह यांना काल भेटण्यास गेले होते.
यावेळी मा. आयुक्त तथा अध्यक्ष शेखर सिंह म्हणाले की, तुमच्या कामाला (योजनेला) मी मंजुरी देऊन झाली आहे. आणि त्यासाठी अनुदानाला मी पुढील वर्ष (2024) येऊ देणार नाही. त्याच्या अगोदरच मी याच वर्षात देणार आहे, तुम्ही निश्चित रहा असा त्यांनी आम्हाला शब्द देऊन, आश्वावासित केले. असे सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. बी. शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले पूढे ते बोलले की ही माता रमाई आवास घरकुल योजना पिंपरी-चिंचवड मनपा मध्ये सूरू व्हावी म्हणून आम्ही साधारणता सहा वर्ष लढलो अनेक आंदोलन उपोषण केलेत खूप काही भोगले तेव्हां कोठे ही माता रमाई आवास घरकुल योजना पिंपवड मध्ये सूरू होत आहे. उशिरा का होईना पण ही योजना आपल्या मनपाच्या भागात सूरू होत आहे याचा आनंद आहे. यावेळी प्रा. बी. बी. शिंदे, हरिश्चंद्र शिंदे, लक्ष्मण सिरसट, दिलीप बनसोडे, सौ. सुनिता कांबळे, सौ. शालन ओव्हाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!