कलाक्रीडामहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच ऑलिंपिया क्रिडा महोत्सवाचे आयोजन-फिरोज शेख

पिंपरी, पुणे (दि. ८ जानेवारी २०२४) माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच जिल्हास्तरीय ऑलिंपिया गेम्स क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी दि. १० जानेवारी ऑलिंपिक वीर पै. मारुती आडकर यांच्या हस्ते पिंपरी, अजमेरा कॉलनी येथील डॉ. हेगडेवार क्रिडा संकुल येथे ऑलिंपिया गेम्स क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी दिली.
या उद्घाटन समारंभास आंतरराष्ट्रीय हॉकीपटू अजितेश रॉय तसेच क्रिडा अधिकारी महादेव कासगावडे, दादासाहेब देवकाते, चंबादास स्वामी, अनिता केदारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी ४ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत शहरातील विविध भागातील शाळांमध्ये क्रिडा ज्योत नेण्यात येणार आहे. यामध्ये सांघिक गटात फुटबॉल, (१२ वर्षे मुले, १४ वर्षे मुले मुली);बास्केटबॉल (१०,१२,१४ वर्षे मुले, मुली); क्रिकेट (१२ वर्षे मुले, १४ वर्षे मुले, मुली) हँडबॉल (१२ वर्षे मुले, १४ वर्षे मुले, मुली); हॉकी (१२, १४ वर्षे मुले, मुली); खो-खो (१२,१४ वर्षे मुले, मुली) व लंगडी (१०, १२, १४ वर्षे मुले, मुली) या स्पर्धा आणि वैयक्तिक गटात मैदानी स्पर्धा कराटे (८ ते १४ वर्षे मुले, मुली), रोप स्किपिंग (१०, १२, १४ मुले, मुली) व स्केटिंग (५ ते १४ वर्षे मुले, मुली) या स्पर्धा होणार आहेत. विजेत्या खेळाडू व संघाना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन बक्षीस वितरण समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून महामंडळाचे मान्यताप्राप्त काम पाहणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन, ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी www.mahamandal@games.com ऑफलाईन नोंदणी करण्यासाठी महामंडळाचे संचालक निवृत्ती काळभोर (९८८१३६५११३) किंवा महामंडळाचे सचिव महादेव फपाळ (९८२२६१६७४९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महादेव फपाळ यांनी केले आहे.
काल सोमवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी महामंडळाचे संचालक निवृत्ती काळभोर, आकांक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष तृप्ती धनवटे, महामंडळाचे सचिव महादेव फपाळ, खजिनदार निळकंठ कांबळे, पदाधिकारी मुकेश बिरांजे, राकेश प्रसाद, आशिष मालुसरे, राम मुदगल, राधिका काळे, वैशाली इंदलकर, रेणू शर्मा आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!