आंदोलनदेश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

राज्य व केंद्रातील सत्ता परिवर्तनाचा संकल्प पिंपरीमध्ये भरपावसात हजारोंच्या उपस्थितीत..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ जानेवारी २०२४ लोकशाहीच्या रक्षणासाठी केंद्रातील मोदी सरकार, राज्य सरकार आणि एकंदरीतच भाजपची ध्येय धोरणे, विचारसरणी, दडपशाही, द्वेष दबावाचे राजकारण, जनतेची लूट, विषमता निर्मिती या आणि इतरही सर्व लोकशाही विरोधी बाबी विरोधात डॉ. विश्वंभर चौधरी आणि ॲड.असीम सरोदे यांच्या पुढाकारातून राज्यभर सुरू असलेल्या निर्भय बनो आंदोलनाची सभा पिंपरी चिंचवड शहरामध्ये इंडिया आघाडी मित्रपक्ष समूहाच्या वतीने काल दि. ०६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ०६ वा. पिंपरी चौकात आयोजित करण्यात आली होती.
या सभेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला अगदी भर पावसात सुद्धा नागरिकानी जागेवरच उपस्थित राहून लोकशाही वाचविण्याचा आणि त्या साठी ही भाजपा प्रणित सत्ता परिवर्तनाचा लढा अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुरोगामी चळवळीचे नेते मानव दादा कांबळे, मारुती भापकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलासभाऊ कदम तसेच इंडिया आघाडी मित्रपक्ष समूहातील पिंपरी चिंचवड शहरातील नेते, पदाधिकारी आणि विविध सामाजिक संस्था, संघटना व असख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!