
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०९ जानेवारी २०२४ केंद्र सरकारच्या हुकूमशाहीचा तीव्र निषेध! करत सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर बोलले की केंद्रातील नरेंद्र मोदी व अमित शहा सरकारच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने Lok शाही मराठी वृत्तवाहिनी आज दि.९जाने.२०२४ सायं.६ वा. पासुन बंद करण्याचा आदेश दिला आहे. लोकशाही मराठी वाहिनीच्या माध्यमातून सरकारच्या चुकीच्या धोरणावर स्पष्ट मत मांडले जात होते. लोकांपर्यंत सत्य जावे असा या वाहिनीचा प्रयत्न होता. अभिव्यक्तीचा घटनात्मक अधिकार हुकूमशाही पद्धतीने केंद्र सरकारने संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे. हा घटनाद्रोह, लोकशाहीद्रोह आहे. केंद्र सरकारच्या या हुकूमशाहीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत. लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार व त्यांचे सर्व पत्रकार यांच्या समवेत आम्ही लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी व लोकशाहीचे सक्षमीकरण व्हावे यासाठी खांद्याला खांदा लावून रस्त्यावरचा लढा लढू! असे मत व्यक्त केले यावेळी भापकरांचे समर्थक निर्भय बनोचे कार्यकर्ते उपस्थित होते.



