महाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

भारताच्या पहिले मुस्लिम शिक्षिका समाजसुधारक फातिमा शेख यांची जयंती भोसरी येथे साजरी करण्यात आली.

प्रतिनिधी अनिरूद्ध चव्हाण पिंपरी चिंचवड दि. १० जानेवारी २०२४ शाह जमात शान ऐ फकीर फाउंडेशन यांच्या वतीने काल दि. ०९ जानेवारी २०२४ रोजी पहील्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती साजरी करण्यात आली फातिमा शेख यांच्या कार्याची माहिती उपस्थित लोकांना देण्यात आली फातिमा शेख यांचा जन्म ०९ जानेवारी १८३१ रोजी पुणे येथे झाला अमेरिकन शिक्षक प्रशिक्षण संस्थेत त्यांची भेट सावित्रीबाई फुलेंशी झाली १८४८ साली पुण्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली या शाळेत फातिमा शेख शिक्षिका म्हणून सोबत होत्या फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सोबत शिक्षणाच्या कामाला सुरवात केली त्यांनी सर्व जाती धर्माच्या मुलाना शिकवले फातिमा शेख यांनी आयुष्यभर समतेसाठी दारोदार जाऊन शिक्षणांचे महत्व पटवून देणयाचे काम केले. यावेळी कार्यक्रमा साठी प्रमुख उपस्थिती मोहसीन भाई शाह, हरीश डोळस, रूवाब शाह, मोहम्मद शाह, जाहीद शाह कार्यक्रमाचे आयोजन शाह जमात शान ऐ फकीर फाउंडेशन पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अतहर भाई शाह यानी केले कार्यक्रम यशस्वी करणयासाठी हरुन शेख, जावेद शाह, अजहर शाह, वसीम शाह, मकसूद अहमद यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!