गून्हामहाराष्ट्रविशेषशहर

” नव्या वर्षात चाकण पोलीसांकडुन पुन्हा दमदार कारवाई’ सराईत मोटार सायकल चोरटा अशोक सोनवणेला शिताफीने अटक, १२ मोटार सायकली जप्त.

प्रतिनिधी पिपंरी चिचंवड दि. ११ जानेवारी २०२४ पिपंरी चिचंवड पोलीस आयुक्तालया अतंर्गत चाकण पोलीस ठाणे हददीमध्ये मोठया प्रमाणात औदयगिक क्षेत्र असल्याने अज्ञात व्यक्तिंकडुन मोटारसायकल चोरी होत असल्याने मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त,
पिपंरी चिचंवड, सह पोलीस आयुक्त, श्री. सजंय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३ श्री. संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांनी मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड
करण्याबाबत श्री. अशोक कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांना सुचना दिल्या होत्या.
श्री. अशोक कदम, वरीष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांनी वाहन चोरांकडुन चाकण पोलीस ठाणे हददीतील गुन्हे उघड करण्यासाठी सपोनि प्रसंन्न जऱ्हाड व विक्रम गायकवाड तसेच अमंलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले असता वरील अधिकारी व अंमलदार यांनी मोटार सायकल चोरीच्या घटनास्थळावर भेट देवुन सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सराईत रेकॉर्ड वरील मोटार सायकल चोर अशोक मधुकर सोनवणे रा. राळेगन थेरपाळ ता. पारनेर
जि. अहमदनगर हा मोटार सायकल चोरीमध्ये असल्याचे निष्पन्न झाले होते.
मोटार सायकल चोर अशोक सोनवणे याच्या एका पेक्षा जास्त बायका असुन तो पुणे, अहमदनगर, नाशिक तसेच औरंगाबाद या जिल्हयांमध्ये आपले वेगवेगळी नावे सांगुन पोलीसांपासुन आपले अस्तित्व लपवुन
वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होता त्यामुळे त्याचे निश्चित राहण्याचे ठिकाणा बाबत माहिती मिळत नव्हती.
श्री. अशोक कदम, वरीष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांनी चाकण पोलीस स्टेशन कडील सपोनि विक्रम गायकवाड, सफौ सुरेश हिंगे, पोहवा हनुमंत कांबळे, पोकॉ संदिप गंगावणे, पोकॉ महेश कोळी यांचे पथक तयार
करून आरोपी अशोक सोनवणे याचा शोध सुरू केला, पथकाने आरोपी अशोक सोनवणे याचा शिकापुर, शिरूर, राळेगण थेरपाळ, सुपे, भाळवणी तसेच नाशिक जिल्हयातील नांदगाव तालुक्यात आरोपीचा मागमुस ०७ दिवस शोध
घेवून त्यास अतिषय शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्या नतंर त्याचेकडे तपास केला असता त्याने यापूर्वी वेळोवेळी चाकण पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे हद्दीतुन चोरी केलेल्या एकुण १२ मोटार सायकली काढून दिलेल्या गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.

चाकण पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी कौशल्यपुर्ण तपास करून अतिशय शिताफिने आरोपी नामे अशोक मधुकर सोनवणे वय ४० वर्षे, रा. राळेगन थेरपाळ ता. पारनेर जि. अहमदनगर यास अटक केलेली असुन त्यांचेकडुन एकुण १२ मोटारसायकल जप्त करून मोटार सायकल चोरीच्या एकुण ०९ गुन्हयांची उकल केलेली आहे. तसेच इतर ०३ वाहनांच्या इंजिन नंबर व चेसी नंबर वरून वाहन मालकांची माहिती घेवुन उकल करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, श्री. सजंय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३ श्री. संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. युनुस मुलाणी तसेच सपोनि प्रसंन्न ज-हाड, सपोनि विक्रम गायकवाड, सफौ सुरेश हिंगे, पो हवा / संदिप सोनवणे, पोहवा / राजु जाधव, पो हवा / हनुमंत कांबळे, पोना / निखील शेटे, पोकॉ / नितीन गुंजाळ, पोकॉ / सुनिल भागवत, पोकॉ / संदिप
गंगावणे, पोकॉ / अशोक दिवटे, पोकॉ / महेश कोळी, पोकॉ / विवेक सानप, पोकॉ / प्रतिक चव्हाण, मपोका / माधुरी कचाटे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सफौ संतोष सुपेकर हे करीत आहेत.
चाकण पोलीसाकंडुन अवाहन करण्यात येते की,
१) आपण मोठया किंमतीच्या मोटार सायकली विकत घेता परंतु २ / ३ हजार रूपयांचे जीपीएस लावत नाही, आपल्या वाहनांना जीपीएस लावावे.
२) आपले वाहन सीसीटीव्ही च्या कक्षेत पार्कंग करावे.
३) वाहन रस्त्यावर कोठेही बेवासर सोडुन जास्तकाळ ठेवुन निघुन जावु नये.
४) आपले वाहनाचे गाडीला/ डिकीला चावी सोडुन जावु नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!