महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पोलीस आयुक्त मा. विनयकुमार चौबे यांचे हस्ते वाकड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नुतन कक्षाचे उद्घाटन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १४ जानेवारी २०२४ काल दि. १३ जानेवारी २०२४ वाकड पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सामान्य नागरीकांच्या तक्रारीचे निवारण तात्काळ होण्यासाठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे सर्व सामान्य नागरीकांना सहज उपलब्ध व्हावे आणि तसे झाल्यास नागरीकांच्या तक्रारीचे निवारण लवकर होईल.
नागरीकांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी सुसंवाद होईल. याच दुरदृष्टीकोनातुन पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त मा. विनयकुमार चौबे सर यांचे हस्ते आज वाकड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नुतन कक्षाचे उद्घाटन पार पडले. वाकड पोलीस ठाणेत आत आल्यानंतर अगदी सहज दृष्टीक्षेपात पडेल असे हे कक्ष नागरीकासाठी आता खुले झाले आहे. निश्चीतपणे हा प्रयत्न नागरीक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सुसंवादाचा एक दुवा असणार आहे.
सदर उद्घाटन सोहळयास अप्पर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, पोलीस उप- आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त श्री. बापु बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. श्रीराम पौळ, पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल साळुंखे व वाकड पोलीस ठाणे कडील अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!