महाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरातील शहीद शूर वीरांना विनम्र अभिवादन -प्रा. बी. बी. शिंदे.

प्रतिनिधी अनिरूद्ध चव्हाण व मनिषा पवार पिंपरी चिंचवड दि. १५ जानेवारी २०२४ काल सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना,( महा. राज्य)च्या वतिने ३०व्या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ “नामांतर सोहळ्या निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना,( महा. राज्य) चे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी.बी. शिंदे यांनी या दिवसाचे महत्व सांगतांना बोलले की विश्वभूषण, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावं मराठवाडा विद्यापीला देण्यात यावे या मागणीसाठी सोळा वर्षे लढा देऊन अखेर मराठवाडा विद्यापीठाला
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ “असे नावं शासनास द्यावेच लागले, परंतु याकरिता मराठवाड्यातील फुले, शाहू, आंबेडकर विचार धारेवर निष्ठा ठेऊन जगणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेस विषमतावादी समाजातील चलाख गावगुंडाकडून, अमानुष अत्याचार सहन करावा लागला, त्यात एकशे चाळीस शूर वीर शाहिदाना आपल्या प्राणाचे बळी द्यावे लागेल. त्यास आज तीस वर्षे झाली, त्यामुळे सध्या आमच्या एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत.
त्याकरिता सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटनेच्या माध्यमातून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३० वा वर्धापन दिन व नामांतर लढ्यातील शूर वीर शहीद वीरांना अभिवादन, “भीम सृष्टी, पिंपरी येथे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, प्रा. बी. बी. शिंदे, यांचे अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला.
यावेळी नामांतर शूर वीर गौतम वाघमारे, पोचिराम कांबळे, चंदर कांबळे, जनार्धन मेवाडे, सूहासिनी बनसोडे, यांना आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सर्व हारा समाजाचे राज्य उपाध्यक्ष पँथर दत्ताभाऊ गायकवाड, युवा पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ ठोके, रिपब्लिकन सेनेचे नेते राजाभाऊ गायकवाड, प्रा. युवराज भास्कर, राजू साळवी, मनोज गजभार, गिरीश साबळे, सुरेश भिसे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी महासचिव नारायण मस्के, अशोक जावळे, सचिन वाघमारे, राजेंद्र पवार, रमेश कांबळे, मोहन गायकवाड, गौतम तायडे, शरद जाधव, मधुकर गायकवाड, लक्ष्मण कांबळे, नेते सुरेश भिसे, माऊली बोऱ्हाडे, राजकुमार चव्हाण, कवी गीतकार गोविंद गाडे, सागर ओव्हाळ, प्रकाश जाधव इत्यादी प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आभार मा. प्रवीण कांबळे यांनी मानून कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!