महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

श्रीमान नारायण राणेंनी आता वानप्रस्थाश्रमाचा रस्ता धरावा-डॉ. कैलास कदम

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १५ जानेवारी २०२४
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नसतानाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई झाली आहे. हिंदू धर्मातील सर्वोच्च असलेल्या शंकराचार्यांनीही अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे आहे असे स्पष्ट केले आहे. परंतु भाजपाचे लोक शंकराचार्यांवरच तोंडसुख घेऊ लागले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यात एक पाऊल पुढे टाकत शंकराचार्यांचे योगदान काय? असा प्रश्न विचारून शंकराचार्य व हिंदू धर्माचा अपमान केला आहे. शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या श्रीमान नारायण राणे यांचे तरी काय योगदान? असा प्रतिप्रश्न करत राणेंचे वय पाहता त्यांनी आता वानप्रस्थाश्रमाचा मार्ग धरावा, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजपाचा समाचार घेताना शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम पुढे म्हणाले की, नारायण राणे हे राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपात गेले आहेत. भाजपात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याशिवाय गत्यंतर नाही म्हणूनच मोदींसाठी हिंदू धर्माच्या सर्वोच्च पदावरील शंकराचार्य यांनाच तुमचे योगदान काय? असा सवाल विचारून त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. प्रभू श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात कारण त्यांनी आयुष्यात कुठेही मर्यादेची उल्लंघन केले नाही, ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान केला नाही. श्रीराम यांना सत्ता चालून आली असतानाही त्यांनी त्या सत्तेचा त्याग करुन १४ वर्ष वनवासात घालवली. अशा मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मंदिरासाठी शंकराचार्यांवर तोंडसुख घेणारे नारायण राणे सारखे लोक हिंदू धर्म भ्रष्ट करत असून हे लोकच हिंदु धर्माला कलंक आहेत. हिंदु धर्माच्या परंपरेनुसार वयाच्या ५१ ते ७५ वर्षांचा कालखंड हा वानप्रस्थाश्रमात घालवायचा असतो. या कालखंडात सर्वच क्षेत्रातून बाहेर पडून समाजोपयोगी कामे करावीत असे अपेक्षित आहे. नारायण राणे यांचे वय ७१ वर्ष आहे त्यांनी आता वानप्रस्थाश्रमाचा मार्ग धरावा असा, टोला लगावून शंकराचार्यांचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंवर भाजपा कधी व काय कारवाई करणार? असा प्रश्नही शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी विचारला आहे.

यावेळी माजी महिला प्रदेशाध्यक्ष शामला सोनावणे, महिला अध्यक्षा सायली नढे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, एनएसयुआय प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, मागासवर्गिय सेल अध्यक्ष विजय ओव्हाळ, पर्यावरण विभाग अध्यक्ष अक्षय शहरकर, डॉक्टर सेल अध्यक्षा डॉ. मनिषा गरुड, स्वाती शिंदे, अर्चना राऊत, निर्मला खैरे, भारती घाग, शिल्पा गायकवाड, गौरी शेलार, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, बबिता ससाणे, गंगा नाईक, सुनिता मिसाळ, सोमनाथ शेळके, आण्णा कसबे, जितेंद्र छाबडा, सुरज गायकवाड, अमरजीत सिंग, प्रा. किरण खाजेकर, ॲड. मोहन अडसुळ, वाहब शेख, महेश बिराजदार पाटील, दिपक श्रीवास्तव, सतीश नायर, बाबासाहेब बनसोडे, पांडुरंग जगताप, सुधाकर कुंभार, गौतम ओव्हाळ, बसवराज शेट्टी, मिलिंद फडतरे, विशाल कसबे, सतीश भोसले, प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, शांताराम कदम, वसंत वावरे, आकाश शिंदे, इंद्रजीत गोरे, सिध्दांत रिकीबे, मनोज ढकोलिया, अनिल कदम, देवानंद ढगे, आदिसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते काल झालेल्या आंदोलना दरम्यान उपस्थित होते.

अयोध्येत राम मंदिर व्हावे ही सर्वांची इच्छा आहे, त्याला कोणाचाच विरोध नाही. धर्म हा आस्थेचा विषय आहे राजकारणाचा नाही परंतु भारतीय जनता पक्षाने राजकारणात धर्म आणून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अर्धवट मंदिरात प्राण प्रतिष्ठा करण्याची घाई चालवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राणप्रतिष्ठा करुन मतांचा जोगवा मागण्यासाठी हे सर्व चालले आहे. मागील १० वर्षाताली कामांवर भाजपा मते मागू शकत नाही कारण त्यांनी लोकांना सांगावे असे काहीच केलेले नाही त्यामुळे रामाच्या नावावर मतं मागण्याचा हा खटाटोप आहे. राम मंदिरासाठी स्वतंत्र्य न्यास आहे. परंतु भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा इव्हेंट बनवलेला आहे, असेही शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!