विशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार-पाणीपुरवठा विभाग म.न.पा.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १५ जानेवारी २०२४ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडील पाणीपुरवठा विभागाच्या अशुध्द जलउपसा केंद्र रावेत आणि पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेअंतर्गत यंत्रणेची आवश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करणे क्रमप्राप्त असल्यामुळे त्यासाठी रावेत नदी जलउपसा केंद्र येथील गुरुवार दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०६. वाजेपर्यंत रावेत येथील जलउपसा केंद्र बंद राहणार असल्याने पिंपरी चिंचवड शहराचा दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होईल.

तरी नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे मुख्य अभियंता-१ पाणीपुरवठा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!