महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

लहुजी वस्ताद साळवे व अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा प्रत्येक शासकीय इमारत व कार्यालयात लावावी-अविनाश शिंदे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १८ जानेवारी २०२४ आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे व जगविख्यात साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अशी थोर महापुरुष समाजाविमुक्त राहिलेली आहेत. जर आपल्याला स्वतंत्र भेटलं नसतं तर आपण आपली आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि बंधुत्वाने राहिलो नसतो. लहुजी वस्तादांचा ह्या भारत देशासाठी खूप मोठा त्याग आहे. त्यांनी महान क्रांतिकारक घडविले आहेत. त्या पैकी प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे अशी असंख्य क्रांतिकारक घडवणारे लहुजी वस्ताद मात्र पडद्याआडच राहिले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक उपक्रमात महात्मा फूले व माता सावित्रीबाई फुले यांना लहुजी वस्ताद यांनी संरक्षण दिले होते. अशी ही इतिहासात नोंद आहे की त्यांनी पुण्यातील मांगीरबाबाची समाधी हे त्यांचे स्मृतीस्थळ म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी लहुजी वस्ताद यांनी शपथ घेतली होती की या “शनिवारवाड्यावर पुन्हा भगवा झेंडा ऊभारेन!” असे थोर विचारवंत, लहुजीवस्ताद साळवे यांचे देशासाठी खूप मोलाचे योगदान आहे. हे आपण नाकारू शकणार नाही.
अण्णाभाऊंचा लढा हा सोशीतांचा, कष्टकऱ्यांचा होता. त्यानी तर त्यांच्या जहाल लिखाणातून सोशीतांच्या व कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचारांचे होते, दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना संबोधले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील अण्णाभाऊंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
या अनुषंगाने शासनाने त्वरित या विषयाची नोंद घेवून मान्यता द्यावी व लहुजी वस्ताद साळवे व अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा प्रत्येक शासकीय इमारत व कार्यालयात लावावी अशा विषयाचे निवेदन मा. श्री. आयुक्त शेखर सिंह (पिंपरी चिंचवड महानगरपालिका) यांना “क्रांतीविर विचार मंच (महाराष्ट्र राज्य)”च्या वतिने देण्यात आले.
यावेळी श्री. अविनाश शिंदे, श्री. राज आवळे, श्री. बाबू पाटोळे, श्री. माणिक पोळ, श्री. धीरज सकट, श्री. नाथा शिंदे, श्री. गणेश तुपे, श्री. सागर कापसे, श्री. बापू झाडे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!