महिन्याच्या प्रत्येक आठवडयाच्या दर गुरूवारी “एक दिवस शाळेसाठी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १९ जानेवारी २०२४ वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रामध्ये वाहतूक शाखेचे प्रत्येक प्रभारी अधिकारी यांनी आपआपले विभागामध्ये महिन्याच्या प्रत्येक आठवडयामध्ये दर गुरूवारी “एक दिवस शाळेसाठी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत वाहतूक शाखेच्या एकुण २० टिमच्या माध्यमातुन दर गुरुवारी २० शाळांमध्ये जावुन विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमन, अपघात विषयी माहिती, व्यसनाधिनतेपासुन दुर राहणे, सायबर गुन्हेगारी, सोशल मिडियाचा वापर, स्त्रीयां व मुली यांचा सन्मान करणे इत्यादी मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
काल दि. १८/०१/२०२३४ रोजी वाहतूक शाखेमार्फत सातव्या टप्प्यात एकुण २० टिमच्या माध्यमातुन निवडलेल्या २० शाळांमधून सुमारे ५२१० विद्यार्थ्यांपर्यंत पोहचुन त्यांना पीपीटीद्वारे मुद्देसूद मार्गदर्शन केले. “एक दिवस शाळेसाठी” या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत एकुण सात टप्प्यामध्ये ४०९६१ विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक व चांगला माणुस बनावे या दृष्टीकोनातून पिंपरी चिंचवड वाहतूक विभागामार्फत या प्रबोधनपर उपक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले आहे. तसेच यापुर्वी कार्यक्रमादरम्यान व आजही पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी लिखीत ” एक्झाम वॉरियर्स ” या पुस्तकाचे सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे.
वरील उपक्रम मा. श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड मा. श्री. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. विवेक पाटील पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड यांचे संकल्पनेतून श्री. भास्कर डेरे सहायक पोलीस आयुक्त १ वाहतूक शाखा श्री. सतीश कसबे सहायक पोलीस आयुक्त २ वाहतूक शाखा, श्री. विठ्ठल कुबडे सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा व वाहतूक शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व अधिनस्थ अंमलदार यांचे मार्फतीने काल दि. १८/०१/२०२४ रोजी यशस्वीरित्या पार पडला.
वेळोवेळी उत्सफुर्त प्रतिसाद मिळणार्या या विद्यार्थीभिमुख उपक्रमाचा पुढील टप्पा २५ जानेवारी २०२४ रोजी पार पडणार आहे.
असे पोलीस उप आयुक्त विवेक पाटील वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड यांचे वतीने निवेदनाद्वारे सांगण्यात आले.







