
विषेश प्रतिनिधी गोवा पणजी दि. १९ जानेवारी २०२४ गोवा राज्यातील ख्रिश्चन समाजावर होत असलेला असंविधानीक अन्याय व अत्याचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन याच्या निषेधार्थ गोवा ख्रिश्चन फेडरेशनच्या वतीने पणजी आझाद मैदाना येथे दि.१५ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केलेल्या महासभेत जनतेला संबोधित करताना सामाजिक कार्यकर्ते श्री.राजन नायर म्हणाले, ख्रिश्चन समाज हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणारा ख्रिश्चन समाज आहे ज्याने भारताच्या विकासाला साथ दिली, भारत देशाची सेवा करणारा ख्रिश्चन समाज, शिक्षणाला प्राधान्य देणारा ख्रिश्चन समाज, सर्व समाजातील लोकांसोबत प्रेमाने वागणूक करणारा समाज, भारतात अशा शांतीप्रिय ख्रिश्चन समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत आहेत.
मणिपूरपासून सुरू होऊन महाराष्ट्रापर्यंत अन्याय, अत्याचार पसरले आहेत. गोव्यातही ख्रिश्चन समाजाविरोधात मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे.
या अन्याय आणि अत्याचाराच्या निषेधार्थ समाजाला संबोधित करताना सामाजिक कार्यकर्ते श्री. राजन नायर म्हणाले, संविधान सर्वांसाठी आहे. आम्ही संविधानातील संविधानिक अधिकार आणि त्यासोबतच घटनात्मक कर्तव्येही मोठ्या प्रमाणावर पार पाडतो. आपल्याला आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करण्याचा अधिकार हवा असून तो रोखण्याची ताकद कोणाच्याही हाती नाही. यामध्ये गोवा राज्यातील सर्व फादर, पास्टर, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून त्याबाबत दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती स्नेहा गिते यांना निवेदन देण्यात आले.
या महासभेसाठी फादर कॅटिनो फर्नांडिस, पास्टर अल्टिनो गोम्स, ॲंड विकास वाघमारे, ॲंड जॉन सॅम्युअल, समाजात काम करणारे सर्व कार्यकर्ते, कायद्याचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी (Law students), डॉक्टर, समाजातील बंधू-भगिनी आणि इतर समाजातील हजारो बंधू-भगिनींनी या महासभेला उपस्थित होते.




