वाकड पोलिसस्टेशन हद्दीमध्ये थेरगावात टोळक्याचा राडा १२ जणांना केले अटक..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २२ जानेवारी २०२४ घातक शस्त्रे हातात घेऊन दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने थेरगाव परिसरात राडा केला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी दि. २० जानेवारी २०२४ मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पवारनगर, थेरगाव येथे घडली.
कैवल्य दिनेश जाधवर (वय १९, रा. हडपसर), शिवशंकर शामराव जिरगे (वय २२, रा. थेरगाव), सुमित सिद्राम माने (वय २३, रा. रहाटणी), विराज विजय शिंदे (वय २०, रा. पर्वती पुणे), गणेश बबन खारे (वय २६, रा. थेरगाव), अजय भीम दूधभाते (वय २२, रा. थेरगाव), शुभम चंद्रकांत पांचाळ (वय २३, रा. काळेवाडी), ऋषिकेश हरी आटोळे (वय २१, रा. थेरगाव), रोहित मोहन खताळ (वय २१, रा. थेरगाव), मुन्ना एकनाथ वैरागर (वय २१, रा. थेरगाव), अनिकेत अनिल पवार (वय २७, रा. थेरगाव), प्रीतम सुनील भोसले (वय २०, रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय विलास केदारी (वय २८, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शनिवारी मध्यरात्री पिस्टल, कोयते, लाकडी दांडके आणि दारूच्या बाटल्या घेऊन एकत्र आले. त्यांनी शस्त्रे हवेत फिरवून आजूबाजूच्या लोकांमध्ये दहशत निर्माण केली. दारूच्या बाटल्या रस्त्यावर फोडून रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली वाहने फोडली. तसेच तीन जणांना जबरदस्तीने लुटून त्यांच्याकडील तीन हजार पाचशे रुपये (३५००) जबरदस्तीने चोरून नेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.



